AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत फडणवीसांना पोस्टरमधून टोले

'जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची...' असं बारामतीत लावलेल्या फलकावर लिहिलं आहे.

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत फडणवीसांना पोस्टरमधून टोले
| Updated on: Nov 29, 2019 | 7:50 AM
Share

बारामती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची…’ असं फलकावर (Banner on Devendra Fadnavis in Baramati) लिहिलं आहे.

गेला महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर तोडगा निघाला आणि या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचा मोठा हात असल्यामुळे बारामतीकरांना हुरुप आला आहे.

‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल, तोच होणार, कारण कोणी कितीही उड्या मारल्या तरी सगळी सूत्रं इथूनच हलतात… साहेब…’ असे फलक उभारुन देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाविकासआघाडीच्या नव्या सरकारबाबत 10 विशेष गोष्टी

महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करत अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासातच अजित पवारांनी आपला निर्णय मागे घेऊन राजीनामा दिला. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे बारामतीकरांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. अनेक बारामतीकर अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत करत होते, तर काही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत होते. अखेर आज या सर्व घडामोडींना पूर्णविराम मिळाला.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी चंग बांधला होता. महाराष्ट्र पिंजून काढत भर पावसात सभा घेऊन भाजपविरोधी वातावरण निर्मिती केली गेली. मात्र आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्याच वेळी मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत बिनसले आणि युती तुटली. पवारांनी शिवसेनेशी जुळतं घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अंमलात आला.

विरोधी बाकावर बसण्याचा कौल मिळालेला राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष आज सत्तेत आल्याने बारामतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आनंद साजरा केला. या आनंद उत्सवाबरोबरच फलकाची (Banner on Devendra Fadnavis in Baramati) बारामतीत जोरदार चर्चा सुरु आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.