दिव्यांगासाठीचा लढा, रस्स्त्यावरची लढाई, बच्चू कडू यांनी प्रहारचा इतिहास सांगितला…
आज बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशात आज बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. यात बोलताना त्यांनी प्रहार पक्षाचा (Prahar) इतिहास सांगितला. प्रहार पक्षाने कायम वंचित घटकाला न्याय देण्याचं काम केलं. दिव्यांग बांधवांसाठी काम केलं. त्यामुळे सर्वसामान्य माणूस प्रहारसोबत आहे. गर्दी नाही तर दर्दी असणं महत्वाचं आहे. आज या गर्दीतील सगळेच दर्दी आहेत, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.
जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली सुरुवातीपासूनची लढाई सांगितली.
रवी राणा यांनी माघार घेतली. दिलगिरी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं. त्यामुळे त्यांना माफ केलं.पण येत्या काळात जर कुणी पुन्हा असं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असं बच्चू कडू म्हणालेत.
माझं नाव बच्चू आहे. पण त्याच्या पुढे कडूदेखील आहे. त्यामुळे लोकांनी वाट्याला जाताना दोनदा विचार करावा, असंही बच्चू कडू म्हणालेत.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडलं होतं. तेव्हा जर आतासारखं मीडिया कव्हरेज मिळालं असतं. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते. पण तसं झालं नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. पण टीव्हीवर रोज दिसून उपयोग नाही. तर लोकांचे प्रश्न सुटणं जास्त महत्वाचं आहे,असं बच्चू कडू म्हणाले.
