बीडचा थरार! मृतदेह पाहून खा. प्रीतम मुंडेंना भोवळ, भाजप शहराध्यक्षाची हत्या की आत्महत्या?

ही घटना घडताच बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. शेकडोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत.

बीडचा थरार! मृतदेह पाहून खा. प्रीतम मुंडेंना भोवळ, भाजप शहराध्यक्षाची हत्या की आत्महत्या?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 1:46 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः बीड शहर आणि मराठवाड्यातील भाजपच्या गोटात खळबळ माजवून देणारी घटना आज घडली आहे. बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या (Beed Suicide) वाटत असून बंदुकीतील गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंभीर बाब म्हणजे भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूची बातमी कळताच खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तेथील धक्कादायक चित्र पाहून त्यांना भोवळ आली.

खा. प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या अत्यंत निकटचे समजले जाणारे भगीरथ बियाणी यांच्या अशा एकाएकी निधनाने प्रीतम मुंडे यांना धक्का बसला. रुग्णालयात बियाणी यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या पोहोचल्या. मात्र तेथील मृतदेह पाहूनच खा. प्रीतम यांना भोवळ आली. मुंडे यांचीही तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. अत्यंत जवळचा आणि निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने खा. प्रीतम मुंडे अस्वस्थ झाल्या.

हे धक्कादायक चित्र पाहून खा. प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

Bhagirath biyani

गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून भगीरथ बियाणी यांची ओळख होती. मुंडे यांची कोणतीही सभा, कार्यक्रम असले की भगीरथ बियाणी यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होत नसे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सर्व राजकीय कामाची जबाबदारी भगीरथ बियाणी यांच्याकडे होती. त्यांच्या विश्वासू समर्थकांपैकी एक ते होते.

भगीरथ बियाणी यांच्या राहत्या घरीच ही घटना घडली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास बंदुकीतून गोळी झाडण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात भगीरथ बियाणींचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी तत्काळ त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

सध्या बियाणी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बियाणी यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

दरम्यान, ही घटना घडताच बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. शेकडोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत. बीडमध्ये नुकताच दसरा मेळाव्या निमित्त पंकजा मुंडे यांचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या गोटात ही अत्यंत दुःखद घटना घडली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.