AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात

चंद्रपूर : शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे […]

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

चंद्रपूर : शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे भाजपशी पुन्हा युती झाल्याने नाराज आहेत. शिवाय, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे अर्थात युती झाल्याने बाळू धानोरकर यांना शिवसेनेकडून चंद्रपुरातून लोकसभा लढवता येणार नाही. त्यामुळे बाळू धानोरकरांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या :

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत