‘पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्ममंत्र्यांचा नाही, तर फक्त भगतसिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो’

Punjab : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला आहे. 92 आमदार निवडून आणण्याची किमया आपनं पंजाबमध्ये करुन दाखवली आहे.

'पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्ममंत्र्यांचा नाही, तर फक्त भगतसिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो'
रोड शो दरम्यान, भगवंत मान आणि अरविंद केजरीवालImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:52 PM

पंजाब : सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा नाही, तर शहीद भगतसिंह (BhagatSingh) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) फोटो लावला जाईल, असं भगवंत मान (Bhagwant Man) यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते. भगवंत मान यांनी सरकारी कार्यालयांतील फोटोंबाबत केलेल्या घोषणेनंतर एकच जल्लोष उपस्थितांनी केला. दरम्यान, याबोसत भगवंत मान यांनी सुरक्षेच्या कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या बाबतीतही महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 122 लोकांची सुरक्षा कमी केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे 403 पोलिस कर्मचारी आता पुन्हा पोलिस ठाण्यात परतले असल्याचं भगवंत मान यांनी म्हटलंय. भगवंत मान हे लवकरच पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दरम्यान, त्याआधी पंजाबमध्ये काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळालाय.

महत्त्वाची घोषणा

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला आहे. 92 आमदार निवडून आणण्याची किमया आपनं पंजाबमध्ये करुन दाखवली आहे. त्यानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी पंजाबमध्ये विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंजाबमधील जनतेचे आभार मानताना भगवंत मान यांनी महत्त्वाची घोषणा केली. 122 लोकांची सुरक्षा कमी केल्यामुळे 403 पोलिसांसह 27 पोलिस वाहनं आता पुन्हा एकदा पोलिस स्थानकात परतली असल्याची माहिती भगवंत मान यांनी दिली आहे.

पंजाबमध्ये आपचं सरकार जुन्या परंपरागत जोखडीतून बाहेर पडून नव्या पद्धतीनं काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंजाबमध्ये आपचं सरकार येईल, असा विश्वास आपल्याला आधीपासूनच होता, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. पंजाबच्या नॉवेल्टी चौकवर काढण्यात आलेल्या रोड शोवेळी ते बोलत होते.

शपथविधी कधी?

16 मार्च रोजी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान हे शपथ घेतील. त्यांचा शपथविधी सोहळा मोठा थाटामाटात व्हावा, यासाठी आपकडूनही जय्यत तयारी केली जाते आहेत. दरम्यान, रविवारी केजरीवाल आणि भगवंत मान यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना केली. सुखबीर सिंह बादल, प्रकाश सिंह बादल, चरणजीतसिंह चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू या सगळ्या दिग्गजांना मात देत आपनं पंजाबमध्ये विजयी झेंडा फडकवला आहे. दरम्यान, सरकार स्थापनेआधी भगवंत मान यांनी पोलिस सुरक्षेसोबत सरकारी कार्यालयातील फोटोंवरुन घेतलेल्या निर्णयांचंही सर्व स्तरातून स्वागत केलं जातंय.

पाहा काय म्हणाले भगवंत मान?

संबंधित बातम्या :

पंजाब विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य

मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चन्नी यांना धूळ चारली! वाचा आपच्या ‘आम’ उमेदवाराबद्दल

‘मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!’ अशोक गेहलोत म्हणतात, ‘राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं’

Video: जत्रा पहायला गेलेल्या मुलींवर सरेआम लैंगिक अत्याचार! मध्य प्रदेशची टाळकं गरम करणारी घटना

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.