Bhandara : भंडाऱ्यात भाजपचे 2 गट भिडले! झेडपी निवडणुकीचा वाद विकोपाला, तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल

| Updated on: May 14, 2022 | 7:21 AM

भाजपच्या दोन गटात सभागृहातच वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही गट एकमेकांसोबत भिडल्याने सदस्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी महिला सदस्याच्या तक्रारीवरून जि. प. चे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Bhandara : भंडाऱ्यात भाजपचे 2 गट भिडले! झेडपी निवडणुकीचा वाद विकोपाला, तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल
झेडपी निवडणुकीचा वाद विकोपाला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भंडारा – भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेत काँग्रेसने (Congress) भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांच्याशी हातमिळवणी केली आणि अध्यक्ष उपाध्यक्षपद मिळवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. नाना पटोले (Nana Patole) यांना पर्यायाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तिथं कंबर कसली आहे. तसेच भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या गटाला हाताशी धरून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना बहुमत जुळवता आले नाही. त्यामुळे भाजपचे दोन गट विभागले गेले. 10 मे ला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सभागृहात पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम हजर होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर भाजपच्या दोन गटात जोरात राडा झाला. वाद झाल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

भाजपाच्या दोन गटात सभागृहात वाद झाला

भाजपच्या दोन गटात सभागृहातच वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही गट एकमेकांसोबत भिडल्याने सदस्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी महिला सदस्याच्या तक्रारीवरून जि. प. चे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, ताले यांच्या तक्रारीवरून भाजपच्या दुसऱ्या गटातील चौघांविरुद्ध भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभागृहात झालेल्या वादामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून उपाध्यक्ष संदीप ताले, सभापती नंदू रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्याविरोधात कलम 354, (अ), 294,323, 34 भादवी सहकलम 3(1) (आर) (एस) 3(1) (डब्ल्यू) (1) (2)3(2) (विए) अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकाऱ्यांसमोर वादावादी

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांमध्ये असलेले मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदेत सुध्दा हेच दिसून आले आहे. सत्ता मिळवण्यासाठी आणि एका पक्षाला दूर ठेवण्यासाठी हा वाद झाला आहे. दोन्ही गटांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासमोर वादावादी झाली आहे.