कोकणात धुमशान! भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल, सेना पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावरून कलगीतुरा

मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर आमदारकीची जागा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. त्यावरून भास्कर जाधवांनी तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

कोकणात धुमशान! भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल, सेना पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावरून कलगीतुरा
शिवसेना आमदार भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 10:41 AM

रत्नागिरीः शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधवांच्या रडारवर आलेत. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडत थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणणाऱ्या राष्ट्रवादी नेते सुनील तटकरेंवर जाधवांनी राजकीय प्रहार केलाय.

भास्कर जाधवांचा तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न

मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर आमदारकीची जागा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. त्यावरून भास्कर जाधवांनी तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची 2024 साली रिक्त होणारी जागा राष्ट्रवादीत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनील तटकरे यांनी द्यावी, असा सल्ला भास्कर जाधवांनी तटकरे यांना देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाटी सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतल्याने कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची 2024 विधान परिषदेची जागा कुणबी समाज्याला द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केलीय. त्याच बरोबर कुणबी समाज्यावर सुनील तटकरे यांचे प्रेम आहे की आपल्या घराण्याकरिता प्रत्येक गोष्ट करत आलेत हे सिद्ध करण्याची ही नामी संधी असल्याचं विधान करत टोला लगावलाय.

दोन आमदारकी आणि खासदारकीवर अप्रत्यक्ष बोट

भास्कर जाधवांचा सुनील तटकरे यांच्या एकाच घरातील दोन आमदारकी आणि खासदारकीवर अप्रत्यक्ष बोट दाखवलंय. कोकण स्थानिक स्वराज्या संस्थेच्या विधान परिषदेच्याा जागेवरून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे आमदार म्हणून निवडून आलेत. एखाद्या समाजाला राज्याच्या तिजोरीतून पैसे देऊन पक्ष प्रवेश करून घेणं हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आवडलेलं नसणार, असं सांगत भास्कर जाधवांनी तटकरेंवर प्रहार केलाय.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! 35 वर्षांपासून महानिर्मितीकडे असलेलं कोयना धरण विकण्याच्या तयारीत

विधान परिषदेची रणधुमाळी, सतेज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज लढत

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.