शरद पवारांना मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसणार आहे. हिंगोलीतील एक प्रमुख नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. हा नेता कोण आहे ते जाणून घेऊयात.

शरद पवारांना मोठा धक्का, हा बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Sharad Pawar and Ajit Pawar
| Updated on: Jun 03, 2025 | 1:54 PM

गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. सर्वप्रथम एकनाथ शिंदे बंड करुन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवारही राष्ट्रवादीतून बाहेर पडले. याकाळात अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यानंतरच्या काळातही बरेच नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सामील झाले. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना मोठा फटका बसला. अशातच आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. हिंगोलीतील एक प्रमुख नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हिंगोलीतील ‘हा’ नेता शरद पवारांची साथ सोडणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना हिंगोलीत मोठा धक्का बसणार आहे. राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल पतंगे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 8 जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल पतंगे पक्षप्रवेश करणार आहेत. पतंगे यांच्यासह अनेक कार्यकर्तेही शरत पवारांची साथ सोडणार आहेत. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

8 जूनला पक्षप्रवेश होणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना अनिल पतंगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही आठ तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.’

शरद पवारांची साथ का सोडणार?

अनिल पतंगे यांनी शरद पवारांची साथ का सोडणार या प्रश्नावर बोलताना सांगितले की, ‘शरद पवार यांच्यावर आमची कोणतेही नाराजी नाही. मात्र काळानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मागील १० वर्षापासून आम्ही सातत्याने विरोधात बसतोय. याचा परिणाम विकासकामावर होत आहे, त्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.’

 

Follow Us