AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या नेत्यानं सोडली साथ, काँग्रेसमध्ये मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून, काँग्रेसमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाला आहे.

मोठी बातमी! राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या नेत्यानं सोडली साथ, काँग्रेसमध्ये मोठा पक्षप्रवेश
Breaking News
| Updated on: Nov 04, 2026 | 4:31 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेला मोठा धक्का बसला आहे. रणजित शिरोळे यांनी मनसेची साथ सोडली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हा पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील रणजित शिरोळे यांनी पक्षाचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 2009 मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. रणजित शिरोळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कोण आहेत रणजित शिरोळे? 

रणजित शिरोळे हे पुण्यातील मनसेचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी  मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील पक्षाचं काम पाहिलं आहे. त्यांनी 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.  रणजित शिरोळे हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत होते.  पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचं काम केलं.  मार्च 2023  मध्ये राज ठाकरे यांनी त्यांची मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली होती. एवढंच नाही तर 2009 मध्ये मनसेने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी देखील दिली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना 75  हजार मतं पडली होती. ते या मतदारसंघामधून तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते.

रणजित शिरोळे यांचे वडील. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. ते काँग्रेसमध्ये होते. दरम्यान या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना रणजित शिरोळे यांनी म्हटलं की, या पक्षाशी माझ्या कुटुंबाचे जुनेच संबंध आहेत.  एक व्यक्ती म्हणून काम करायचं आहे, त्यासाठी मी आता काँग्रेस हे माध्यम निवडलं आहे.  देशाच्या जडणघडणीत या पक्षाचं मोठं योगदान आहे. आज ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी वादळ उभे केले आहे, त्या वादळाचा एक भाग होण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात मी आता जोडलो गेलो आहे आता पक्षाचे काम करेल, पक्ष जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असं यावेळी सिरोळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा  मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?