AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी आणि काँग्रेसलाही पर्याय उभा राहतोय? विरोधकांची नावं गडद होतायत, 5 घडमोडी महत्त्वाच्या!

भाजपाने मिशन 2024 साठी बड्या नेत्यांचे दौरे सुरु केले असतानाच नितीश आणि केजरीवाल यांच्या भेटीला मोठे अर्थ असल्याचं म्हटलं जातंय.

मोदी आणि काँग्रेसलाही पर्याय उभा राहतोय? विरोधकांची नावं गडद होतायत, 5 घडमोडी महत्त्वाच्या!
नितीश कुमार-अरविंद केजरीवाल भेटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 4:27 PM
Share

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2024 साठी एकिकडे भाजपने (BJP) अख्खा भारत पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.  एक-एक मोहरे गळून पडलेली काँग्रेस हळू हळू उभं राहण्याची तयारी करतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) तगडा चेहरा देण्यासाठी चाचपडतेय. तर दुसरीकडे इतर पक्षांनी आपापल्या पातळीवर विरोधकांची नावं अधोरेखित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आज दिल्लीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांनी भेट घेतली. यानंतर ते ओमप्रकाश चौटालांसह इतर विरोधी नेत्यांच्याही भेटी गाठी घेत आहेत. त्यामुळे ही मोटबांधणी मोदी आणि काँग्रेसला शह देणारी ठरतेय की काय, अशी चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. या अनुशंगाने राष्ट्रीय पातळीवरील 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत-

नितीश कुमार- अरविंद केजरीवाल भेट

बिहारमधील जदयू नेते, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज भेट झाली. भाजपाने मिशन 2024 साठी बड्या नेत्यांचे दौरे सुरु केले असतानाच नितीश आणि केजरीवाल यांच्या भेटीला मोठे अर्थ असल्याचं म्हटलं जातंय.

नितीश-केजरीवाल मैत्री

नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. केजरीवाल यांनी कधीही नितीश कुमारांवर टीका केलेली नाही. नितीश कुमारांनी आधी एनडीएसोबत सरकार स्थापन केले. नंतर लालूंच्या राजदसोबत गेले. तरीही केजरीवालांनी विरोधी वक्तव्य केलेले नाही. आता नितीश कुमारांच्या दिल्लीभेटीनंतर दोन नेत्यांमधील संबंध अधिक सुधारतील, अशी चर्चा आहे.

आप पाय पसरतोय…

अरविंद केजरीवाल यांनी आधी दिल्लीची सत्ता मिळवल्यानंतर पंजाबमध्येही आपचं सरकार स्थापन केलंय. दिल्लीत अरविंद केजरीवालांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात राबवलेल्या निर्णयांचं अनेकांकडून स्वागत होतंय. इतर ठिकाणीही इथल्या शिक्षणातील मॉडेलचे दाखले दिले जातायत. आता गुजरात निवडणुकांसाठीही आपने कंबर कसली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हेदेखील विरोधकांमधील महत्त्वाचे नेते म्हणून अधोरेखित होत आहेत.

नितीश-सीताराम येच्युरी भेट

नितीश कुमारांनी दिल्लीत सीपीआय (एम) कार्यालयात सीताराम येच्युरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, ” आपण सोबत आहोत, म्हणूनच मी येथे आलोय… तर सीताराम येच्युरी म्हणाले, संपूर्ण देशातले डावे पक्ष एकत्र आले तर खूप मोठ्या घडामोडी घडतील. संविधान मानत असलेल्यांनी एकत्र येऊन विरोधकांची मोट बांधावी लागेल…

केजरीवाल काँग्रेस एकत्र येणार?

अरविंद केजरीवाल आणि नितीश कुमार यांचे संबंध चांगले आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये काँग्रेसला विरोध करत आपने सरकार आणले. काँग्रेसलाच एक पर्याय म्हणजे आप, असे अरविंद केजरीवालांना ठसवायचं आहे. पण बिहारमध्ये तर नितीश कुमारांनी राजद आणि काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांची मोट बांधायची वेळ आल्यास केजरीवाल काँग्रेस एकत्र येणार का, हा मोठा प्रश्न आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.