AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, चिडलेल्या चिराग पासवानांनी पाचही खासदारांना पक्षातून हाकललं

Bihar Politics : एनडीएची साथ सोडून आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी ऑफर RJD आणि काँग्रेस आघाडीने चिराग पासवान यांना दिली आहे.

पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, चिडलेल्या चिराग पासवानांनी पाचही खासदारांना पक्षातून हाकललं
Chirag Paswan
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 15, 2021 | 5:32 PM
Share

पाटणा : बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) उलथापालथी सुरु आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते (LJP) आणि खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.  काका पशुपती पारस (Pashupati Paras ) यांनी पक्षातून बेदखल केलं आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याशी फारकत घेतल्याने, पासवान यांच्या घरात आणि पक्षात उभी फूट पडली आहे. दरम्यान, चिराग पासवान यांनी यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर आता त्यांनी उर्वरित पाचही खासदारांना पक्षातून काढून टाकलं आहे.

दुसरीकडे आता चिराग पासवान यांना विरोधी पक्षांकडून तगड्या ऑफर येत आहेत. काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी चिराग पासवाना यांना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. (Bihar Politics Chirag Paswan RJD offers join with us and make Tejswai Yadav CM)

एनडीएची साथ सोडून आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी ऑफर RJD आणि काँग्रेस आघाडीने चिराग पासवान यांना दिली आहे.

तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री करा : RJD

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई बिरेंद्र यांनी चिराग पासवान यांना तेजस्वी यादवांसोबत येण्याचं आवाहन केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती ही दोन युवा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करुन, तुमच्या पक्षाने (LJP) दिल्लीचं राजकारण करावं, असं आमदार बिरेंद्र म्हणाले.

काँग्रेसकडूनही ऑफर

तिकडे काँग्रेसनेही चिराग पासवान यांना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमचंद मिश्रा यांनी, चिराग पासवान यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होऊन विरोधी पक्षाला आणखी मजबूत करावं असं म्हटलं आहे.

काकाच्या बंडाने चिराग पासवान एकाकी

लोकजनशक्ती पक्षाचे 6 खासदार आहेत. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांनी 5 खासदारांसह बंड पुखारलं आहे. पाचही खासदारांनी पशुपती पारस यांना आपला नेता मानलं आहे. इतकंच नाही तर लोकसभेत संसदीय नेते म्हणूनही चिराग यांच्या जागी पारस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे चिराग पासवान एकाकी पडले आहेत.

काकांना भेटण्याचा प्रयत्न

चिराग पासवान या सर्व पार्श्वभूमीवर काका पशुपती पारस यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भेट झालीच नाही. पशुपती पारस यांच्या मते, “चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता. त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे पक्ष वाचवण्यासाठी हेच योग्य पाऊल आहे”

बिहारमध्ये नेमकं काय घडलं आहे?

रामविलास पासवान यांचा पक्ष आहे लोकजनशक्ती पार्टी. त्यांच्या निधनानंतर पासवानांचा मुलगा चिराग पासवान हेच पार्टीचे सर्वेसर्वा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोजपा एनडीएतून बाहेर पडला. तो निर्णय पूर्णपणे चिराग पासवान यांचा होता. लोजपाला फारसं यश मिळालं नाही. लोकसभेत लोजपाचे चिराग पासवानसह 6 खासदार आहेत. त्यातल्या पाच जणांनी आता वेगळी चूल मांडत चिराग पासवान यांना एकटं पाडलं आहे. विशेष म्हणजे लोजपातल्या ह्या बंडाचं नेतृत्व दुसरं तिसरं कुणी केलं नसून ते आहेत रामविलास पासवान यांचे लहान भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस.

संबंधित बातम्या 

बिहारमध्येही पुतण्यावर काका भारी, पासवानांच्या पक्षात फूट, कुटुंबही विस्कटलं; वाचा सविस्तर

(Bihar Politics Chirag Paswan RJD offers join with us and make Tejswai Yadav CM)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?