AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाण्यात भाजपाला मोठा धक्का; अनेक कार्यकर्ते आज करणार ठाकरे गटात प्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे. आज बुलडाण्यातील अनेक भाजपाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

बुलडाण्यात भाजपाला मोठा धक्का; अनेक कार्यकर्ते आज करणार ठाकरे गटात प्रवेश
| Updated on: Oct 18, 2022 | 12:46 PM
Share

मुंबई :  मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक हे शिंदे गट आणि भाजपात (BJP) प्रवेश करत आहेत. मात्र बुलडाण्यात (Buldana) ठाकरे गटाने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. बुलडाण्यातील भाजप कार्यकर्ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हे कार्यकर्ते हाती शिवबंध बांधणार आहेत. केवळ भाजपच नाही तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी (NCP) आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील काही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील हे कार्यकर्ते आहेत. तसेच आज बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक देखील मातोश्रीवर होणार आहे.

शिवसैनिकांची मातोश्रीवर बैठक

दरम्यान आजा मातोश्रीवर बुलडाण्यातील शिवसैनिकांची बैठक देखील होणार आहे. जूनमध्ये शिवसेनेचे आमदार फुटले, जुलैमध्ये खासदार फुटले. मात्र जिल्ह्यात शिवसेनेचं संघटनात्मक कार्य सुरूच आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. आज सुदैवाने वेळ जुळून आली. आज निमित्त देखील आहे. भाजप, राष्ट्रवादी, आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.

रोहित पवार यांचे भाजपावर गंभीर आरोप

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

Follow Us
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे