“खडसेंना भाजपने दिलेली वागणूक अत्यंत वाईट आणि दुर्दैवी”

| Updated on: Dec 08, 2019 | 7:37 PM

अनेक कष्ट आणि तणावातून खडसे मोठ्या पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर येणार ही वेळ येणं दुर्देवी आहे." असेही थोरात यावेळी (Balasaheb throat on eknath khadse)  म्हणाले.

खडसेंना भाजपने दिलेली वागणूक अत्यंत वाईट आणि दुर्दैवी
Follow us on

नाशिक : “भाजप सत्तेत येण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान राहिलं आहे. त्यांना जी वागणूक भाजपमध्ये दिली जात आहे. ती सर्वसामान्य माणसाला न आवडण्यासारखी आहे.” असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb throat on eknath khadse) यांनी केलं आहे. “तसेच अनेक कष्ट आणि तणावातून खडसे मोठ्या पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर येणार ही वेळ येणं दुर्देवी आहे.” असेही थोरात यावेळी (Balasaheb throat on eknath khadse)  म्हणाले.

“भाजप सत्तेत येण्यामागे नाथाभाऊंचे मोठ योगदान राहिलं आहे. कारण ते विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात होते. त्यावेळी आम्ही सत्तेवर होतो. त्यांचे काम अत्यंत प्रभावी अस राहिलं. पण त्यांना एकंदर जी वागणूक दिली गेली. ती सर्वसामान्य माणसाला ही न आवडण्यासारखी आहे. पण आता त्यांचा खूप रोष आहे ही वस्तूस्थिती आहे.” असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

“एखादा कार्यकर्ता तयार होतो आणि नेतेपदाला पोहोचतो. यात त्याचं खूप वर्षाचे योगदान असते. खूप कष्ट असतात अनेक प्रश्न असतात. या सर्व स्थितीतून पोहोचल्यावर त्याच्यावर अशी परिस्थिती येणे हे अत्यंत दुर्देवी आहे. जर ते काँग्रेसमध्ये आले तर अशा व्यक्तीचे आम्ही स्वागत करु,” असेही बाळासाहेब थोरात (Balasaheb throat on eknath khadse)  म्हणाले.

“काँग्रेसमध्ये आज होणारी बैठक रद्द झाल्याचे कारणही थोरात यांनी स्पष्ट (Balasaheb throat on eknath khadse)  केलं. सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात गेले आहे. त्यामुळे आजची बैठक रद्द झाली आहे. उद्या ही बैठक पार पडणार आहे.

तसेच शिवसेना खासदारांची बैठक रद्द होण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. सध्या लोकसभा अधिवेशन सुरु आहे. त्यात आज रविवार असल्याने शिवसेना खासदारांने येणे शक्य नाही. त्यामुळे कदाचित मातोश्रीवरील बैठक रद्द झाली असावी.” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

खातेवाटपाबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “आज किंवा उद्या खातेवाटपाचा विषय पूर्ण होईल. पुढील पाच वर्षे सरकार चालवायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ जरी लागत असला, तरी लवकरच खातेवाटप होऊन मंत्रिमंडळ विस्तार होईल. याच पार्श्वभूमीवर उद्या बैठक होईल,” असेही थोरात यांनी (Balasaheb throat on eknath khadse)  सांगितले.

“पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश हा विषय वरिष्ठ पातळीवर होईल. पण या व्यक्तींचा राज्यासाठी उपयोग व्हायला हवा. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपद न देण्याबाबत सोनिया गांधी यांनी काहीही सांगितलं नाही.” असेही बाळासाहेब थोरात (Balasaheb throat on eknath khadse)  म्हणाले