AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ईट का जवाब पत्थर से देंगे, बावनकुळेंचा इशारा

नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला. अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ईट का जवाब पत्थर से देंगे, बावनकुळेंचा इशारा
चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 26, 2021 | 3:41 PM
Share

अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसैनिकांनी आक्रमक होत विविध शहरातल्या भाजप कार्यालयांवर हल्ले चढवले. कुठे दगडफेक झाली तर कुठे सेना-भाजप कार्यकर्ते भिडले. पुणे-नाशिक-अमरावतीच्या भाजप कार्यालयांवर सेनेचे कार्यकर्ते चाल करुन गेले. याच आक्रमक सेना कार्यकर्त्यांना भाजपनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे.  आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.

‘ईट का जवाब पत्थर से देंगे’

नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला. जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच तोफ डागली. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथून पुढे जशास तसं प्रत्युत्तर देतील, असं ते म्हणाले.

डिसेंबरपूर्वी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा नाहीतर फिरु देणार नाही

डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही तर महाविकास आघाडी च्या मंत्र्यांना गावागावात फिरू देणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात एक हजार कोटीचा धान खरेदी घोटाळा अधिकाऱ्या समक्ष झाला आहे. या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केलीय, अशी माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून तातडीने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा बावनकुळे यांनी केली.

(BJP Chandrashekhar Bawankule Warning Shivsena karykarta)

हे ही वाचा :

काहींचं राजकीय पर्यटन सुरू, जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

अनिल परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक; प्रताप सरनाईकांना विचारताच म्हणाले, मी स्वत:च अडचणीत

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...