इंदापुरात रंगलंय ग्रामपंचायतीचं राजकारण, भाजपचा 38 तर राष्ट्रवादीचा 42 ग्रामपंचायतींवर दावा

इंदापुरात रंगलंय ग्रामपंचायतीचं राजकारण, भाजपचा 38 तर राष्ट्रवादीचा 42 ग्रामपंचायतींवर दावा (Bjp claims 38 & Ncp claims 42 grampanchayat in indapur)

इंदापुरात रंगलंय ग्रामपंचायतीचं राजकारण, भाजपचा 38 तर राष्ट्रवादीचा 42 ग्रामपंचायतींवर दावा
भाजपचा 38 तर राष्ट्रवादीचा 42 ग्रामपंचायतींवर दावा

इंदापूर : तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे सरपंच नेमके किती यावरुन राजकारण रंगल्याचं पहायला मिळतंय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 60 पैकी 38 ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातल्या 42 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्याचा दावा केलाय. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात सतत विविध विषयांवरुन कलगीतुरा रंगलेला असतो. आताही ग्रामपंचायत सरपंच निवडीवरुन दोन्ही नेत्यांनी दावे प्रतिदावे केलेत. त्यामुळं आता या विषयावरून चांगलंच राजकारण रंगलेलं पहायला मिळणार आहे. (Bjp claims 38 & Ncp claims 42 grampanchayat in indapur)

इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर देखील 60 ग्रामपंचायतींमध्ये हर्षवर्धन पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेगवेगळे दावे करीत 36 व 34 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे खरोखरच कोणत्या पक्षाचे नेमके सरपंच किती याविषयी तालुक्यात चर्चा होती. आज दोन्ही दिवसात मिळून 60 ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या निवडी झाल्या. त्यामध्ये एकूण कोणाचे किती सरपंच याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गावांची यादी देत 38 ग्रामपंचायतींचा हिशोब सांगितला. इंदापूर तालुक्यातील जनतेने तसेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात स्पष्ट विरोधी कौल दिला असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 60 पैकी 42 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच निवडल्याचा दावा केलाय.. तर दोन ठिकाणी संमिश्र सत्ता स्थापन केल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय.

या ग्रामपंचायतींवर भाजप राष्ट्रवादीचा दावा

भाजपच्या बाजूने चांडगाव, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे, भिगवन, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, व्याहळी, वरकुटे खुर्द, हगारवाडी, गोतंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी नं.1, गलांडवाडी नं. 2, बाभुळगाव, गोंदी, भांडगाव, नृसिंहपूर, टणू,भोडणी, कचरवाडी( बावडा), पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी (निमगाव) अशा 38 ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच भारतीय जनता पक्षाचे झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेल्या यादीमध्ये सपकळवाडी, अकोले, पोंधवडी, लोणी देवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथुर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारेवाडी, काटी, कळस, तरंगवाडी, तक्रारवाडी, नरसिंगपूर, लासुर्णे, शेटफळगडे, पिंपरी बुद्रुक, शहा, निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, व्याहळी, कुंभारगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी( निमगाव केतकी), सरडेवाडी, कौठळी, जाचक वस्ती, जाधववाडी, भोडणी या गावांचा समावेश आहे. (Bjp claims 38 & Ncp claims 42 grampanchayat in indapur)

इतर बातम्या

Amit Thackeray | ‘राज’पुत्राच्या राजकीय कारकीर्दीची वर्षपूर्ती, बीएमसीच्या कसोटीसाठी अमित ठाकरे सज्ज

पंतप्रधानांनी आंदोलनजीवी सारखा शब्द वापरावा हे या देशाचे दुर्दैव : अमोल कोल्हे

Published On - 5:33 pm, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI