विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरल्याचं पाहून आनंद : देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत देण्यात आली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. (Devendra Fadnavis Assembly Speaker Election)

विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरल्याचं पाहून आनंद : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं, त्याबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Devendra Fadnavis reacts on Maharashtta Vidhansabha Assembly Speaker Election)

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत देण्यात आली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य 3 लाख 5 हजार 611 कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी पाच ते सातपट जास्त मदत”

मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि घोषणांचा सविस्तर तपशील सादर केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात मोदी सरकार महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी पाच ते सातपट जास्त मदत मिळत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“राहुल गांधींनी बजेटमधील पाच आकडे सांगावेत”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अर्थसंकल्पाविषयी कोणीतरी प्रतिक्रिया लिहून देतं आणि ते वाचून दाखवतात, त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी वेगवेगळे आकडे सांगितल्याचं गेल्या वेळी पाहिलां. त्यांनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत, आम्ही प्रतिक्रिया देऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार कोटी, आरे कारशेडला 1832 कोटी, फडणवीसांकडून ‘सोप्या भाषेत’ अर्थसंकल्प सादर

(Devendra Fadnavis reacts on Maharashtta Vidhansabha Assembly Speaker Election)

Published On - 3:31 pm, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI