AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावरकर गौरव प्रस्तावावरुन राडा, आधी भारतरत्न द्या, अभिनंदन करु, सेनेचं भाजपला उत्तर, अजित पवार म्हणतात…

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन विधानसभेत राडेबाजी (Savarkar honour proposal Maharashtra Vidhan sabha) पाहायला मिळाली.

सावरकर गौरव प्रस्तावावरुन राडा, आधी भारतरत्न द्या, अभिनंदन करु, सेनेचं भाजपला उत्तर, अजित पवार म्हणतात...
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 26, 2020 | 1:17 PM
Share

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन विधानसभेत राडेबाजी (Savarkar honour proposal Maharashtra Vidhan sabha) पाहायला मिळाली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली. त्यासाठी विरोधकांनी विधानसभेत एकच गोंधळ घातला. (Savarkar honour proposal Maharashtra Vidhan sabha)

सावकरांच्या गौरव प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांना बलात्कारी म्हटलंय, माफीवीर म्हटलंय, त्या मासिकावर बंदी घालावी. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटतेय. सावरकरांनी देशासाठी मोठं योगदान दिलंय. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे”

दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनीही अध्यक्षांना प्रस्ताव देत सत्तापक्षाने दोन ओळींचा सावरकर गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. तसंच देशासाठी प्रचंड कष्ट झेलणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या गौरवासाठी जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर ते लाजीरवाणं आहे असं मुनगंटीवार म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

शिवसेनेचं उत्तर

भाजपच्या या मागणीनंतर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिलं. “अध्यक्षमहोदय, भाजपने जो प्रस्ताव मांडलाय, त्याची तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊन सभागृहाचं कामकाज सुरु करावं. नितेश राणे यांचंही मत या प्रस्तावाबाबत घ्यावं. त्यांना तसा प्रस्ताव मांडायला सांगा. त्याहून पुढे सांगतो, सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा, त्यानंतर तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही मांडतो, तुमचा आणि मोदी साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो”, असं अनिल परब म्हणाले.

अजित पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान या सर्व वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं निवेदन मांडलं. “सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही. त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो. केंद्रात  सत्ता असून त्यांना भारतरत्न का दिला नाही माहित नाही. दोन वेळा देवेंद्र फडवणीस यांनी पत्र दिले आहे. पाच वर्ष त्यांचं सरकार होतं, मात्र आजच गौरव प्रस्ताव का? सावरकरांचं योगदान आहे, पण त्यांच्याबाबत वेगवेगळी मतं आहेत. सावरकर विज्ञानवादी होते, गाय-बैलांबाबत त्यांचं मत काय होतं हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपआपली मतं असू शकतात”, असं अजित पवार म्हणाले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...