Devendra Fadnavis : सोनिया गांधींवर ज्या कारणाने टीका केली, त्याची पुनरावृत्ती नको म्हणूनच उपमुख्यमंत्री झालो: देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 05, 2022 | 6:58 PM

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिल्यांदाच आले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या.

Devendra Fadnavis : सोनिया गांधींवर ज्या कारणाने टीका केली, त्याची पुनरावृत्ती नको म्हणूनच उपमुख्यमंत्री झालो: देवेंद्र फडणवीस
फडणवीसांना उपममुख्यमंत्री करून भाजपनं अपमानित केलंय, दिग्विजय सिंह यांनी पुन्हा डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यासाठीच भाजप (bjp) नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. या निर्णयामुळे फडणवीस नाराज असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, या सर्व चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद घेण्यामागचं नेमकं कारण त्यांनी आज उघड केलं. भाजप एक्स्ट्रॉ कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी (गैरसंवैधानिक अधिकार क्षेत्र) बनण्याच्या विरोधात आहे. सोनिया गांधी जेव्हा एक्स्ट्रॉ कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी बनून काम करत होत्या, तेव्हा आम्ही त्यांच्यावर टीका करत होतो. त्यामुळे भाजपमध्ये तसं घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आमची इच्छा आहे आणि आदेश आहे त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये जा, असं पक्षाने मला सांगितलं. त्यानुसार मी सरकारमध्ये सामिल झालो आणि उपमुख्यमंत्री झालो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिल्यांदाच आले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. पक्षाध्यक्ष जेपी नड्डांनी पब्लिक स्टेटमेंट दिलं. सर्वांची इच्छा होती की सरकार बाहेर राहून चालत नाही. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीनी सरकार चालवणं योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. माझ्या वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

त्यात कमीपणा नाही

मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यात मला कुठलाही कमीपणा नाही. शिंदेंसोबत आम्ही काम केलंय. ते आज आमचे नेते आहेत. त्यामुळे माझं त्यांना संपूर्ण सहकार्य राहणार आहे. आम्ही दोघे मिळून राज्याची जी गाडी पटरीवरून खाली उतरली ती पुन्हा पटरीवर आणू. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबरवन करू, असंही त्यांनी सांगितलं.

घरी बसवलं असतं तरी ऐकलं असतं

पक्षाचा आदेश सर्वोच्च होता. कारण याच पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसवलं. पक्षाने मला सांगितलं असतं तुमची गरज नाही घरी जा. तर मी काहीही न म्हणता मी घरी गेलो असतो. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. कारण पक्षाला माझी गरज होती, असं ते म्हणाले.

शहा पहाडासारखे उभे राहिले

अमित शहा या काळात आमच्या पाठी पहाडासारखे उभे राहिले. आमच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो. आता हे सरकार अडीच वर्ष चालेल. नव्याने पुन्हा कौल घेऊन आम्ही निवडून येऊ, असंही त्यांनी सांगितलं.