Devendra Fadnavis : शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये खदखद कधीपासून होती?; फडणवीसांनी सांगितली अंदर की बात!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी त्यांचं आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Devendra Fadnavis : शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये खदखद कधीपासून होती?; फडणवीसांनी सांगितली अंदर की बात!
शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये खदखद कधीपासून होती?; फडणवीसांनी सांगितली अंदर की बात!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 6:08 PM

नागपूर: शिवसेनेच्या एक दोन नव्हे तर तब्बल 40 आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत या आमदारांनी बंड केलं. त्यांच्यासोबत इतर दहा अपक्ष आमदारही आले. हे आमदार सत्ता असूनही अस्वस्थ होते. आपला मुख्यमंत्री असून कामं होत नव्हती. निधी मिळत नव्हता. कोणी विचारत नव्हते. मुख्यमंत्री भेट देत नव्हते. जे लोक कधी लोकांमधून निवडून आले नाहीत, ते लोक अपमानित करत होते. पक्षावर अशा लोकांचं नियंत्रण आलं होतं. शिवाय खात्यांमध्ये इतरांची ढवळाढवळ सुरू होती. या सर्व कारणांमुळे शिवसेनेच्या (shivsena) आमदारांमध्ये खदखद होते. तीच अवस्था अपक्षांची होती. बंडखोर आमदारांनीच ही सल व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, आमदार अस्वस्थ आहेत आणि त्यांना आपल्याकडे ओढलं पाहिजे हे भाजपच्या कधी लक्षात आलं? आणि भाजपने या आमदारांवर जाळं कसं टाकलं हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काही अंशी भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी त्यांचं आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोलताशे वाजवून त्यांची त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. संध्याकाळी ते प्रेस क्लबमध्ये आले आणि त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांची मनमुराद गप्पा मारल्या. सर्व गोष्टी आज सांगायच्या नाहीत ही सस्पेन्स फिल्म आहे. ती लवकरच तुमच्याकडे येईल. पण एवढंच सांगतो. ही खदखद पहिल्या दोन महिन्यातच माझ्या लक्षात आली. मी त्यावर नजर ठेवून होतो. योग्यवेळी योग्य गोष्टी करणं यालाच राजकारण म्हणतात. असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

ती उद्धव ठाकरेंची चूक नाही

काल पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माईक खेचला होता. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माईक खेचला पुढे काय काय खेचतील माहीत नाही, असा टोला लगावला होता. त्याकडे फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. तेव्हा त्यांनी पलटवार केला. ते कशाबाबत बोलले ते माहीत नाही. शिंदे आणि आम्ही ज्यावेळी विश्वासमत जिंकलो. तेव्हा मी पहिल्यांदा बोलायला लागलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून फार वेळा विधानसभेत आले नाही. अर्थात त्यांची ती चूक नाही. जेव्हा मुख्यमंत्री विश्वासमत जिंकतात तेव्हा ते आभाराचं भाषण करतात. बाकी लोक अभिनंदनाचं भाषण करतात. प्रथा, परंपरा म्हणून मी उपमुख्यमंत्री म्हणून भाषण केलं. आम्ही एकमेकांना देणारे आहोत, घेणारे नाहीत. चिंता करू नका, असा चिमटा त्यांनी ठाकरेंना काढला.

आमच्यात ती पद्धत नाही

फडणवीसांच्या पोस्टरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. वरिष्ठ नेत्यांचा फोटो काढणं ही आमच्यात पद्धत नाही. आम्हाला जे काही यश मिळालंय, जे काही आम्ही आहोत ते मोदी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळेच. मोदींनी केलेल्या कामामुळेच हे यश मिळालं. कार्यकर्ते खुश आहेत. वरिष्ठ नेते पाठिशी नसते तर मी हे करूच शकलो नसतो, असं त्यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू. कारण बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री ठाण्याला गेले नव्हते. मी नागपूरला आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही आपआपल्या जिल्ह्यात आलो. उद्यापरवा बसून टाईमटेबल ठरवू. फॉर्म्युला ठरवू. तुम्हाला सांगू, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.