बहिणींच्या नावाने अजित पवारांच्या बेहिशेबी मालमत्ता, त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही : सोमय्या

| Updated on: Oct 13, 2021 | 4:08 PM

अजित पवार यांनी बहिणींच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमवलीय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय.

बहिणींच्या नावाने अजित पवारांच्या बेहिशेबी मालमत्ता, त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही : सोमय्या
अजित पवार, किरीट सोमय्या
Follow us on

पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी आणि विक्रीत घोटाळा झालेला आहे. त्यामुळे आयकर विभागाने कारवाई केली. पण अजित पवारांनी मात्र भावूक स्टेटमेंट देत माझ्या बहिणीच्या घरी धाडी टाकल्या गेल्या, केंद्र सरकार सूडाच्या वृत्तीने राजकारण करतंय, अशी भावूक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. मात्र त्यांनी त्यांच्या बहिणींच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमवलीय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय.

धाडीनंतर अजित पवारांनी भावुक स्टेस्टमेंट केलं की माझ्या बहिणीच्या घरी धाडी टाकल्या. जरंडेश्वर घेतलेल्या कंपनीत एक संचालक विजया पाटील यांचे पती मोहन पाटील आहेत, आता तुम्ही सांगा बहिणींच्या घरी का धाडी पडल्या? बहिणीच्या नावाने बेनामी संपत्ती करणं हे दुर्दैवी आहे” अशी टीका किरीट सोमय्यांनी केली. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

“नेटफिलक्सने सिरीयल बनवली तर…”

“जरंडेश्वरचे 90 टक्के शेअर्स 27 लेअर नंतर शेवटी स्पार्किंग सोईलकडे आहेत आणि त्याचे मालक आहे सुनेत्रा अजित पवार आणि अजित अनंतराव पवार आहेत. या कंपन्यांच्या गुंतवणुकीत 57 नामी-बेनामी कंपन्या आहेत. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफिलक्सने सिरीयल बनवली तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते, यातला सिझन 1 हा अजित पवार असेल” असा टोलाही सोमय्यांनी लगावला.

अजित पवार, तुम्ही आता खुलासा करा!

जरंडेश्वरचे जे मुख्य मालक आहेत, भागधारक त्यात एक नाव आहे मोहन पाटील… जे विजया पाटीलचे पती आणि दुसऱ्या आहेत नीता पाटील, मला पवारांना विचारायचंय, या नीता, मोहन, विजया कोण आहेत?, काही लोकांनी मला सांगितलं की विजया आणि नीता या अजित पवारांच्या बहिणी आहेत, तर मोहन हे विजया पाटील यांचे पती आहे. आता अजित पवारांनी पुढील खुलासा करावा, असं किरीट सोमय्या म्हणाले.

पदाचा फायदा घेऊन संस्थांना फायदा होत असेल तर…

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे गुरु, त्यांना गुरू म्हणतात. मंत्र्यांच्या व्यवसायावर प्रतिबंध नाही, मात्र पदाचा फायदा घेऊन स्वतःच्या संस्थांना फायदा पोहोचवत राहणं गैर असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा :

नेटफिलक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना 2-3 कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांचे तिरके बाण