धनंजय महाडिकांनी घेतली राजू शेट्टींची भेट, जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण

| Updated on: Jul 08, 2021 | 10:27 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची आज गुरुवारी भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले आहे.

धनंजय महाडिकांनी घेतली राजू शेट्टींची भेट, जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण
DHANANJAY MAHADIK RAJU SHETTY
Follow us on

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांची माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आज गुरुवारी भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचे दोन्ही नेते सांगत आहेत. मात्र, असे असले तरी जिल्हापरिषद अध्यक्ष निवड व जिल्ह्यातील बदलत्या राजकीय घडामोडी याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. महाडिक यांनी शेट्टी यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली. (BJP leader Dhananjay Mahadik meets Raju Shetti amid Kolhapur Zilla Parishad president election)

जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीसाठी राजकीय घडामोडी वाढल्या

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ निवडणुकीचे वातावरण काहीसे शांत होते. तोच आता कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीसाठी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर धनंजय माहाडिक यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. यावेळी महाडिक यांच्यासोबत विठ्ठलराव निंबाळकर, राजवर्धन निंबाळकर, रामचंद्र डांगे, अशोकराव माने, अनिल उर्फ सावकार मादनाईक, शितल गतारे, बजरंग खामकर, शैलेश आडके, शंकर नाळे,सागर मादनाईक, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता हे भेटसत्र झाले. या भेटीमध्ये भाजप नेते तसेच राजू शेट्टी यांच्यात कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर जवळपास एक तास चर्चा झाली.

फक्त मैत्रीच्या अनुषंगाने भेट होती

या भेटीबाबत बोलताना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप पक्षाचा संपर्क दौरा होता. आज शिरोळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. याच वेळी माजी खासदार राजू शेट्टी यांचीही भेट घेतली. मात्र, ही भेट फक्त मैत्रीच्या अनुषंगाने होती, असे सांगितले. तसेच या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याविषयी त्यांनी माहिती दिली नाही.

भेटीला आले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही

तर राजकीय नेतेमंडळी माझे मित्र आहेत. त्यामुळे भाजप नेते आज माझ्या भेटीला आले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माझ्या घरी कोणालाही येण्यास मी कधीही नाकारलेले नाही, असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले. तसेच पुढे बोलताना स्वाभिमानी अथवा माझा सर्वांनी फक्त राजकीय वापर केला, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षाच्या निवडीसाठी केवळ चार दिवस उरले असल्याने येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून राजकीय समिकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय. याच समीकरण जुळवण्याचा भाग म्हणजे महाडिक-शेट्टी यांची भेट नव्हती ना  ? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

इतर बातम्या :

Eknath Khadse ED Inquiry : एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, सहकार्य करण्याचं खडसेंचं आश्वासन

…अखेर ते शब्द आमदार संजय गायकवाडांनी जाहीररीत्या घेतले मागे

(BJP leader Dhananjay Mahadik meets Raju Shetti amid Kolhapur Zilla Parishad president election)