AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अखेर ते शब्द आमदार संजय गायकवाडांनी जाहीररीत्या घेतले मागे

पत्रकार परिषद घेऊन ते शब्द मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय. परंतु खोट्या ॲट्रॉसिटी संदर्भातल्या वक्तव्यावर मात्र ते ठाम असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

...अखेर ते शब्द आमदार संजय गायकवाडांनी जाहीररीत्या घेतले मागे
शिवसेना आमदार संजय गायकवाड
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 9:17 PM
Share

बुलडाणाः अस्त्र-शस्त्र घेऊन दहा हजार जणांचा फौजफाटा घेऊन गावात दाखल होईन, हे शब्द अखेर आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी जाहीररीत्या मागे घेतलेत. पत्रकार परिषद घेऊन ते शब्द मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय. परंतु खोट्या ॲट्रॉसिटी संदर्भातल्या वक्तव्यावर मात्र ते ठाम असल्याचे म्हणालेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (Those Words Were Publicly Taken Back By MLA Sanjay Gaikwad)

खोट्या ॲट्रॉसिटी संदर्भातल्या वक्तव्यावर मात्र ते ठाम

खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर या गावात विभिन्न समाजाच्या दोन कुटुंबांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला होता, मात्र बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावातील वाघ कुटुंबीयांना भेट देऊन वादग्रस्त तसेच जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आज आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यालयावर पत्रकार परिषद घेत त्यामध्ये अस्त्र-शस्त्र घेऊन दहा हजार जणांचा फौजफाटा घेऊन गावात दाखल होईल, हे शब्द त्यांनी जाहीररीत्या मागे घेतले असून, खोट्या ॲट्रॉसिटी संदर्भातल्या वक्तव्यावर मात्र ते ठाम असल्याचे त्यांनी सांगितलेय.

19 जून रोजी या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा-अंबिकापूर या गावात हिवराळे आणि वाघ या दोन कुटुंबांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला आणि 19 जून रोजी या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामध्ये हिवराळे कुटुंबीयातील एकावर चाकूने वार झाल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला आणि त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर परस्पर विरोधी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यापैकी दोन्ही कुटुंबातील काही व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असून काही जण फरार आहेत.

विविध पक्षाच्या नेत्यांनी गावात जाऊन दोन्ही कुटुंबाच्या भेटी घेतल्या

या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी गावात जाऊन दोन्ही कुटुंबाच्या भेटी घेतल्या. मात्र या प्रकरणाला नवे वळण मिळाले ते म्हणजे आमदार संजय गायकवाड यांनी 30 जून रोजी शेकडो समर्थकांसह चितोडा गावात भेट देऊन त्या ठिकाणी वाघ कुटुंबीयांची भेट घेऊन कोणी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात खोटे चोरीचे गुन्हे दाखल करा आणि तरीही गरज पडली तर अस्त्र-शस्त्रासह दहा हजार जणांचा फौजफाटा घेऊन गावांमध्ये दाखल होईल, असे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यानंतर मात्र समाजातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि त्याच दिवशी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे यांनी या गावाला भेट देत खामगावमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले. पाहता पाहता संपूर्ण राज्यभर या घटनेचे लोण पोहोचले. त्यानंतर आज पुन्हा आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषद अस्त्र शस्त्रची भाषा परत घेत असल्याचे जाहीर केलं. मात्र अॅट्रॉसिटीच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे मत व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या

अ‍ॅट्रोसिटीविषयी सेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, रिपाइं आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे आमदारकी रद्द करण्याची मागणी

VIDEO | गाडीतून उतरले, शर्ट काढत झाड हटवलं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार

those words were publicly taken back by MLA sanjay Gaikwad

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.