AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Mungantiwar | खरच सुधीर मुनगंटीवारांची मनापासून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? ते म्हणाले…

Sudhir Mungantiwar | राज्यसभेतील खासदार आणि राज्यातील मंत्र्यांना, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची भाजपाची रणनिती आहे. याचाच भाग म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

Sudhir Mungantiwar | खरच सुधीर मुनगंटीवारांची मनापासून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? ते म्हणाले...
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Mar 12, 2024 | 7:57 AM
Share

Loksabha Election 2024 (सुनील ढगे) | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे. घटक पक्ष काही जागांवर अडून बसले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित होत नाहीय. भाजप किमान 30-32 जागा लढविण्यावर ठाम असून शिवसेनेला 12-13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4-5 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इतक्या कमी जागा मान्य नाहीत. महायुतीमध्ये घटक पक्षांचा सन्मान ठेवला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी आधीच म्हटलं आहे. सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीला महायुतीची बैठक होणार होती. एकनाथ शिंदे, अजित पवार दिल्लीला जाणार होते. पण ही बैठक रद्द झाली. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली, त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते.

राज्यसभेतील खासदार आणि राज्यातील मंत्र्यांना, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची भाजपाची रणनिती आहे. याचाच भाग म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. काल ते सुद्धा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. राज्यात परतल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल त्यांचे विचार जाणून घेतले.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे. मात्र शेवटी यश-अपयश हे ईश्वराच्या हाती आहे. लोकसभेत जाण्याची माझी इच्छा नाही. पण पक्षाचा आदेश सर्वतोपरी असतो” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “मला पक्षाने या राज्याची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरासाठी कास्ट पाठवण्याची संधी मला मिळाली. पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संधी मला मिळाली. वाघ नख घेऊन येण्याचा एमओयु करण्याची संधी मला मिळाली. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये मला ज्याप्रमाणे विकास करण्याची संधी मिळाली. चंद्रपूरचा विकास करताना वेगवेगळी काम करता आली” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“माझी अजून तयारी झाली नाही. मी पक्षाकडे अजून हीच विनंती करतो आहे, मला इथेच राहू द्या असं मी म्हणतो आहे. पण पक्षाने आदेश दिला तर कार्यकर्ता म्हणून ते माझं कर्तव्य आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा