‘विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Jul 19, 2021 | 5:38 PM

खराब हवामान आणि मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्ते मार्गानेच पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही, निलेश राणेंचा हल्लाबोल
निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
Follow us on

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरकडे निघाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे यादेखील आहेत. खराब हवामान आणि मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्ते मार्गानेच पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.  (Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray drove to Pandharpur)

‘जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही, तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण, इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.

केशव उपाध्येंचीही टीका

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ अशा ओळीद्वारे उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.

संबंधित बातम्या : 

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

बेस्ट CM ला देव तरी कसा पावेल, आषाढी वारीवरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray drove to Pandharpur