बेस्ट CM ला देव तरी कसा पावेल, आषाढी वारीवरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पालख्यांसोबत फक्त 50 वारकऱ्यांना परवानी देण्यात आली आहे. यावरुनच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केलीय.

बेस्ट CM ला देव तरी कसा पावेल, आषाढी वारीवरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

मुंबई : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एकादशीच्या माहापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईवरुन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरकडे निघाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या बसमधून पंढरपूरजवळ वाखरी इथं दाखल झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पालख्यांसोबत फक्त 50 वारकऱ्यांना परवानी देण्यात आली आहे. यावरुनच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केलीय. (Keshav Upadhyay criticizes CM Uddhav Thackeray over Ashadhi wari and Warkari)

केशव उपाध्ये यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ अशा ओळीद्वारे उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना

खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.

सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 9 वाजताच्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील. मुख्यमंत्री विमानाने मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते, मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते बाय रोड अर्थात रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले.

संबंधित बातम्या : 

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

Keshav Upadhyay criticizes CM Uddhav Thackeray over Ashadhi wari and Warkari

Published On - 4:41 pm, Mon, 19 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI