AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 3:30 PM
Share

मुंबई : आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले. (CM Uddhav Thackeray left for Pandharpur  in a Range Rover Instead of a Mercedes due to heavy Rain)

सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 9 वाजताच्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील. मुख्यमंत्री विमानाने मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते, मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते बाय रोड अर्थात रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले.

लोणावळानजिक विश्रांतीसाठी थांबण्याची शक्यता

मंबईते पंढरपूर या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री लोणावळाजवळ काही वेळ चहापानासाठी, विश्रांतीसाठी थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पाऊस सुरु आहे. एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्यांचे पार्किंग लाईट्स ऑन करुन ड्रायव्हिंग केलं जात आहे.

मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम

CM Uddhav Thackeray left for Pandharpur in a Range Rover Instead of a Mercedes due to heavy Rain

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.