Nilesh Rane : “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली”, दिवसाच्या सुरूवातीला राणेंचा पहिला बाण मातोश्रीवर

| Updated on: Jul 21, 2022 | 9:42 AM

Uddhav Thackeray : निलेश राणे यांनी दिवसाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत केली आहे.

Nilesh Rane : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली, दिवसाच्या सुरूवातीला राणेंचा पहिला बाण मातोश्रीवर
Follow us on

मुंबई : राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारानांसोबत बंड केलं. त्यानंतर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  मात्र राज्यात झालेल्या या अभूतपूर्व बदलानंतर राणे कुटुंबाने शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीकेची एकही संधी सोडली नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या नेहमीच्या आक्रमक स्टाईलने त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागतोय. अवघ्या देशाचं लक्ष या निकालाकडे लागलंय. अश्यात भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी या महत्वपूर्ण दिवसाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत केली आहे. “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे यांच्यासोबत 20 आमदार नाहीत पण ते कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांची उद्धव ठाकरेंना नेता मानायची इच्छा नाही ते त्याच पार्टीत राहून नेता का बदलू शकत नाही. बाळासाहेबांचे नाव पुरतं घालवलं या उद्धव ठाकरेंनी. सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली…”, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

निलेश राणेंचं ट्विट

निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसं संख्यबळ नाही तरी ते कोर्टात यशस्वी लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांना उद्धव ठाकरे नेता म्हणून मान्य नाहीत, पण त्यांना आपला नेता बदलता येत नाही. याशिवाय त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली असल्याचं निलेश राणे म्हणाले आहेत.