मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर पंकजा मुंडेंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाल्या…

निकाल असा लागणारच नाही असं खरंच कोणाला वाटलं होतं का? | Maratha Reservation Pankaja Munde

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर पंकजा मुंडेंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाल्या...
| Updated on: May 05, 2021 | 2:48 PM

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण रद्द केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. (BJP leader Pankaja Munde on Maratha reservation)

झालं तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी आहे. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाई समोर आहे. आमचा प्रामाणिक “नायक” कोण? आरक्षणाचा खरा “टक्का” कोण सांगेल आणि देईल, हा प्रश्न माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.


आरक्षणाचा खरा टक्का कोण सांगेल?: पंकजा मुंडे

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करायला लावणारा आहे. निकाल असा लागणारच नाही असं खरंच कोणाला वाटलं होतं का? मराठा जीवनातील’ संघर्ष’ हा मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला. झालं तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी आहे. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाई समोर आहे. आमचा प्रामाणिक “नायक” कोण? आरक्षणाचा खरा “टक्का” कोण सांगेल आणि देईल, हा प्रश्न माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation: सुप्रीम कोर्ट म्हणालं मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स: गुणरत्न सदावर्ते

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, कोर्टात कोण काय म्हणालं? ते वाचा सविस्तर

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, छत्रपती संभाजीराजे म्हणतात, आता ठाकरे सरकारनं ‘हे’ करावं!

(BJP leader Pankaja Munde on Maratha reservation)