Pankaja Munde | … आणि पंकजा मुंडे हळहळल्या

| Updated on: Jan 12, 2021 | 8:09 PM

मात्र नुकतंच पंकजा मुंडेंनी ट्विटरवर एक पोस्ट टाकत हळहळ व्यक्त केली आहे. (Pankaja Munde Post After her Bodyguard Mother died)

Pankaja Munde | ... आणि पंकजा मुंडे हळहळल्या
Follow us on

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शासकीय अंगरक्षकाच्या आईचे आज (10 जानेवारी) अपघाती निधन झाले. या अंगरक्षकाचं दुःख ऐकून पंकजा मुंडे या व्याकूळ झाल्या. “खूप वाईट झालं, किती मोठं दुःख लेकराला रे” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. (Pankaja Munde Post After her Bodyguard Mother died)

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांनी दुसरा अंगरक्षक मागवून घेतला होता. पोलीस दलातील गणेश खाडे यांची अंगरक्षक म्हणून वर्णी लागली. गणेश खाडे हे कांदेवाडी येथील रहिवासी आहेत. परळी तालुक्यातील कौडगाव साबळा हे त्यांचे आजोळ आहे. त्यांची आई सुलोचना खाडे काही दिवसासाठी माहेरी आल्या होत्या.

आज सकाळी गणेश खाडे हे आपल्या आईला मोटारसायकलवरून गावी नेण्यासाठी आले. गणेश आणि त्यांची आई घरी परतत असताना नाथरा पाटीजवळ गाडी स्लीप होऊन त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात आई सुलोचना यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश खाडे जखमी झाले.

अपघाताची बातमी कळताच पंकजा मुंडे यांनी गणेश यांना फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकजा यांनी माझ्या बॉडीगार्ड गणेशची आई वारली…खूप वाईट झालं. किती मोठ दुःख लेकराला रे, वडील ही नाहीत, अशी पोस्ट ट्वीटरवर शेअर केली. या फोटोत त्यांचा बॉडीगार्ड, त्यांची आई आणि स्वत: पंकजा मुंडे दिसत आहे.

अंगरक्षक आणि पंकजाताईंचं अनोखं नात

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या नंतर खऱ्या अर्थाने पंकजा ताई पोरख्या झाल्या होत्या. मतदारसंघात फिरत असताना अंगरक्षक असल्यामुळे लोकांना जास्त वेळ देता यायचा. मतदार संघ पिंजून काढण्यास मोठी मदत व्हायची. वडिलांच्या नंतर सतत सावलीसारखे सोबत राहणारे केवळ अंगरक्षक म्हणून नव्हे तर वेगळे नाते पंकजाताई यांनी जोपासले आहे. सकाळच्या नाश्त्यापासून तर दोन वेळच्या जेवणाची देखील पंकजांकडून अंगरक्षकांची विचारपूस होते. गणेश खाडे हे त्यातील एक आहेत. स्वतःचे जीव धोक्यात घालून रक्षण करणाऱ्या अंगरक्षकाचे दुःख पाहून पंकजा मुंडे व्याकूळ आणि निराश झाल्या.

दरम्यान शनिवारी (9 जानेवारी) पंकजा मुंडेंनी परळीत जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी त्यांनी कार्यालयातील क्षण न क्षण व्यस्तता असा एक फोटो ट्वीट केला आहे.

तसेच शुक्रवारी (8 जानेवारी) पंकजा मुंडेंनी दिवसभर ग्रा.पं.निवडणुकीच्या बैठका, वैद्यनाथ व पानगाव साखर कारखान्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या भेटी, त्यांची खासगी व सार्वजनिक कामे आटोपून संध्याकाळी परळी शहरातील कार्यकर्त्यांच्या घरी जेवण घेतले. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

(Pankaja Munde Post After her Bodyguard Mother died)

संबंधित बातम्या :

अन् वैद्यनाथची साखर पाहून पंकजा मुंडेंना अत्त्यानंद…!

परळीत मुंडे Vs मुंडे, लेटर वॉरचा भडका