AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर कडाडले

नायगाव येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना अचानक घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कडाडून विरोध केला आहे. (pravin darekar)

VIDEO: वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर कडाडले
pravin darekar
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 4:32 PM
Share

मुंबई: नायगाव येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना अचानक घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कडाडून विरोध केला आहे. वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे. (BJP leader pravin darekar meets police families in dadar, mumbai)

नायगाव पोलिस वसाहतीमधील पोलिस कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस सरकारकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने नायगाव पोलिस वसाहतीला भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. दरेकरांनी पोलिस बांधावांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकून घेतले व त्यांना धीर दिले. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.

आमचा निधी देऊ, पण बेघर होऊ देणार नाही

पोलिसांना घर सोडण्यास सांगितले जात आहे, पण त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. कोविड काळ असो की सण… कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अविरत मेहनत करून जनतेचे संरक्षण करणारा माझा पोलिस रस्त्यावर राहणार का? आम्ही असे होऊ देणार नाही. प्रसंगी त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करू. राज्य सरकार पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी लागणा-या आवश्यक निधीपासून पळ काढत असेल तर गरज पडल्यास येथील राहिवाशांसाठी विधानसभेतील आमदार मिळून एकत्रित निधी दुरुस्तीसाठी देऊ. परंतु पोलिस बांधवांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांसाठी सरकारला टॉवर बांधायचाय

आयपीएस अधिकाऱ्यांसाठी या जागेत मोठे टॉवर बांधायचे आहेत. त्यामुळे सरकारला आयपीएस अधिकाऱ्यांची काळजी आहे. मात्र दिवस-रात्र परिश्रम करणाऱ्या पोलिसांची काळजी सरकारला नाही. राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे या प्रकरणावरुन दिसून येत आहे. या कारवाईमागे काही कट असेल तर तो आम्ही सफल होऊ देणार नाही. मोठे पगार घेणारे आयपीएस अधिकारी आपल्या राहण्याची सोय करू शकतात, परंतु अल्प वेतन असणारे पोलिस बांधव मात्र आपल्या वेतनामधून साधे झोपडेसुद्धा घेऊ शकत नाही. याचा विचार नोटिस बजावताना सरकारने करायला हवा होता, अशी टीकाही त्यांनी केली.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे असून पोलिस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील आहेत. जर त्यांच्या विषयीच पोलिस खात्यातील महिला आणि येथील रहिवासी संशय व्यक्त करत असतील तर हे दुर्दैवी आहे. पालकत्व म्हणून त्यांनी पोलिस बांधवांची काळजी घेण्याची आवश्यकता होती, मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा प्रकारे स्वतःच तुम्ही येथे कारवाई करत असून यामुळे या प्रकरणात संशय निर्माण होत आहे, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी याप्रश्नी बोलणे झाले आहे. जर या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला नाही तर फडणवीस स्वतः येऊन या प्रकरणाची दखल घेतील. त्यामुळे सरकारने बुलडोझर लावले तर त्या खाली आडवे पडायलादेखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (BJP leader pravin darekar meets police families in dadar, mumbai)

संबंधित बातम्या:

तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात हे समजून घ्या; नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला

संजय राऊत आणि राहुल गांधींची जवळीक वाढतेय?; पाहा हा फोटो काय सांगतो!

Maharashtra Flood : राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा, नुकसानग्रस्तांना कशाप्रकारे मदत दिली जाणार? वाचा सविस्तर

(BJP leader pravin darekar meets police families in dadar, mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.