आम्हाला बहुमत मिळणं कठीण : भाजप नेते राम माधव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणूक प्रचारातील प्रत्येक सभेत भाजपला पूर्ण बहुतम मिळण्याचा दावा करत असताना, भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी मोदी-शाहांच्या दाव्यातील हवा काढली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहण्याचा अंदाज भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी वर्तवला आहे. राम माधव यांच्यासारख्या भाजपमधील दिग्गज नेत्यांनी भाजपच्या …

आम्हाला बहुमत मिळणं कठीण : भाजप नेते राम माधव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणूक प्रचारातील प्रत्येक सभेत भाजपला पूर्ण बहुतम मिळण्याचा दावा करत असताना, भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी मोदी-शाहांच्या दाव्यातील हवा काढली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहण्याचा अंदाज भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी वर्तवला आहे. राम माधव यांच्यासारख्या भाजपमधील दिग्गज नेत्यांनी भाजपच्या बहुमताच्या दाव्यावर शंका व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळातच आता चर्चांना उधाण आलं आहे. तसचे, राम माधव यांनीच मोदी-शाहांच्या बहुमताच्या दाव्याला घरचा आहेर दिला आहे.

“आम्ही आमच्या (भाजप) ताकदीवर 271 जागांचा आकडा गाठला तरी खूप होईल”, असे  राम माधव म्हणाले. मात्र, एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्ही पूर्ण बहुमतात येऊन सत्ता स्थापन करु, असाही विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत राम माधव यांनी मोदी-शाहांच्या बहुमताच्या दाव्याची हवा काढली.

“उत्तर भारतातील ज्या राज्यात भाजपला 2014 साली विक्रमी जागा मिळाल्या होत्या, तिथे नुकसान होऊ शकतं. मात्र, ईशान्य भारतातील राज्य आणि ओदिशा, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होईल.” असे भाजप नेते राम माधव म्हणाले.

कोण आहेत राम माधव?

राम माधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक मानले जातात. सध्या राम माधव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी आहे. शिवाय, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्यही आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील अत्यंत वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *