AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम शिंदे पुण्यात उदयनराजेंच्या भेटीला, धनगर आरक्षणावर चर्चा

मला धनगर समाजाविषयी माहिती आहे, त्यामुळे धनगर समजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली, असं राम शिंदे यांनी सांगितलं.

राम शिंदे पुण्यात उदयनराजेंच्या भेटीला, धनगर आरक्षणावर चर्चा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 04, 2020 | 12:44 PM
Share

पुणे : भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पुण्यात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नातही उदयनराजे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती राम शिंदे यांनी यावेळी केली. माध्यमांना टाळत उदयनराजे यांनी राम शिंदेंना भेट दिली. (BJP Leader Ram Shinde meets MP Chhatrapati Udayanraje discuss Dhangar Reservation)

‘धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल (शनिवारी) माझी नियोजित बैठक खासदार छत्रपती उदयनराजे महाराज यांच्यासोबत झाली. रात्री त्यांना भेटलो, तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विस्तृत आणि तपशीलवार चर्चा झाली’ अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.

‘धनगर समाजाचा लढा अनेक दिवस चालू आहे. समाजाला आरक्षण मिळत नाहीये. घटनेमध्ये तरतूद आहे, अशा अनेक गोष्टींवर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. उदयनराजेंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्या लढ्याला माझा पाठिंबा असल्याचं आश्वासित केल्याचं राम शिंदेंनी सांगितलं. ‘मला धनगर समाजाविषयी माहिती आहे, त्यामुळे धनगर समजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली’ अशी माहितीही राम शिंदे यांनी दिली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे यांनी या राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. सर्व पीडित आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सकारात्मक भूमिका घेतली आहे’ असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

भविष्यात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहे. हा लढा सर्वंकष व्हावा, कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा लढा न राहता समाजाचा लढा व्हावा, अशी भूमिका आपण पुढील काळात घेणार असल्याचंही राम शिंदे यांनी सांगितलं.

मराठा आरक्षण नेतृत्वासाठी मेटेंचा उदयनराजेंना आग्रह

मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे, अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. तसंच “जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे” असा आग्रह शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी केला होता. (BJP Leader Ram Shinde meets MP Chhatrapati Udayanraje discuss Dhangar Reservation)

“गुणवत्तेनुसार आरक्षण द्या”

दुसरीकडे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

उदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी

(BJP Leader Ram Shinde meets MP Chhatrapati Udayanraje discuss Dhangar Reservation)

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक