AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांना मोठा धक्का, राम शिंदेंकडून करेक्ट कार्यक्रम, अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ!

अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतमध्ये अविश्वास ठरावाआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा आहे. या राजीनाम्यानंतर आता कर्जत नगरपंचायत भाजपाचे नेते राम शिंदे यांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रोहित पवारांना मोठा धक्का, राम शिंदेंकडून करेक्ट कार्यक्रम, अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ!
rohit pawar and ram shinde
| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 6:03 PM
Share

अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतमध्ये अविश्वास ठरावाआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा आहे. या राजीनाम्यानंतर आता कर्जत नगरपंचायत भाजपाचे नेते राम शिंदे यांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 नगरसेवक असलेल्या या कर्जत नगरपंचायतमध्ये भाजपाकडे स्वतःचे 2 आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि काँग्रेस यांचे 11 असे 13 नगरसेवक झाले आहेत. ही नगरपंचायत निवडणुकीपासूनच अत्यंत नाट्यमय घडामोडीमुळे चर्चेचा विषय ठरलेली आहे.

नगरपंचायत पुन्हा भाजपाच्या ताब्यात

कर्जत नगरपंचायत ही 17 नगरसेवक असलेली नगरपंचायत आहे. 2022 साली या नगरपंचायतीची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 12, काँग्रेसला तीन, तर भाजपला फक्त दोन नगरसेवक निवडून आणता आले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आणि नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली. मात्र तीन वर्षानंतर पुन्हा एकदा ती भाजपच्या ताब्यात जात आहे. निवडणुकीत ज्याप्रमाणे राजकीय डावपेच आखत रोहित पवार यांनी भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती. आता असेच राजकीय डावपेच मागील पंधरा दिवसांपासून भाजपाकडून खेळले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 पैकी 8 नगरसेवक आणि काँग्रेसचे तीनही नगरसेवक भाजपाच्या होटात दाखल झाले आहेत.

रोहित पवार-राम शिंदेंमध्ये जुंपली

भाजपाच्या दोन आणि आघाडीतून बाहेर पडलेल्या 11 अशा 13 नगरसेवकांनी 7 एप्रिल रोजी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. यानंतर काही दिवसातच राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा अध्यादेश काढला. यावरून आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला.

जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला राजीनामा

दोन दिवसांपूर्वी तेरा नगरसेवकांनी नवीन अध्यादेशाप्रमाणे पुन्हा अविश्वासाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावर आज जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा घेऊन निर्णय करण्याचा आदेश दिला. मात्र कर्जत नगरपंचायतमध्ये सभा सुरू होण्याआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सर्वसाधारण सभा न होता पिठासीन अधिकाऱ्याने नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्याची माहिती दिली.

सगळे पुरावे असल्याचा नगरसेवकांचा आरोप

उषा राऊत यांनी राजीनामा देत असताना आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. मात्र माध्यमांना बोलताना राऊत यांनी थेट सभापती राम शिंदे यांच्यावर आरोप करत पैसे आणि सत्तेच्या दबावात नगरसेवकांना अविश्वास ठराव आणण्यास भाग पाडला असल्याचा आरोप केला आहे. उषा राऊत यांनी आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर केलेला आरोपाचे खंडन करत नगरसेवकांच्या कोण किती विनवण्या करत होतं आणि कोण अमिष दाखवत होतं याचे सगळे पुरावे असल्याचे म्हटलं आहे. वेळप्रसंगी ते देखील बाहेर काढू असा इशाराही भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

…म्हणून आम्ही भूमिका घेतली

तर दुसरीकडे भाजप गटात सहभागी नगरसेवकांनी नगराध्यक्षपद हे अडीच वर्षासाठीच दिलं होतं. मात्र स्वतःहून राजीनामा न दिल्याने आम्ही ही भूमिका घेतली असल्याचे म्हटलं आहे. यात कुठल्याही पैशाचा किंवा दबावाचा काहीही संबंध नाही, असे बंडखोर नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवारांना धक्का

दरम्यान, 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रयत्नाने कर्जत नगरपंचायत आमदार रोहित पवार यांनी ताब्यात घेतली होती. भाजपाच्या नगरसेवकांना त्यांन उमेदवारी दिली होती. मात्र ते नगरसेवक पुन्हा एकदा भाजपाच्या तंबूमध्ये दाखल झाल्याने रोहित पवार यांना राम शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा कर्जतसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.