
नाशिक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे. येथे भविष्यात जी पिढी येईल त्यांना राम कोणत्या वनात राहत होते हे दाखवण्यासाठी वन तरी शिल्लक राहाणार आहे का असा सवाल शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. मग आपण का शेपूट घालून बसलो आहोत असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, याचे सरकारमध्ये आता यांच्यात भांडणे सुरु आहेत. गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच. मिंधे कोण पूर्वाश्रमीचा आपला. गद्दार. नाईक आणि शिंदेत आता लागली आहे. गणेश नाईक म्हणतात मिंध्यांनी एफएसआयचा घोटाळा केला. भाजपने परवानगी दिली तर मिंध्यांचा टांगा उलटा करतो. अरे टांगा कशाला उलटा करता. टांगात टांगा घालू नका असाही मिश्किल सल्ला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आम्ही मुंबईत होर्डिंग लावल्या. होय आम्हीच केलं. कोस्टल रोड शिवसेनेनेच केला असेही ते म्हणाले.
‘आज तुडुंब गर्दी झाली. एक तरी भाड्याचा माणूस आहे का. मुंबईत जिजामाता उद्यान आहे. दहा वर्षापूर्वी आम्ही पेंग्विन आणले. आमच्यावर टीका केली. आज पेंग्विन बघायला पैसे देऊन गर्दी करत आहे. यांच्या सभाला पैसे देऊन लोक येत नाहीत. यांची पेंग्विन एवढीही किंमत नाही असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर बंगाल रस्त्यावर उतरला आहे. मग आपण शेपूट घालून बसणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ते पुढे म्हणाले की हा वचनामा आहे. हा छापलेला रंगीत कागद नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कुणाच्या कामाचं श्रेय घेत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी केली.