Voter List Maharashtra PDF Download : मतदार यादी कशी डाऊनलोड कराल? कुठे पाहाल?; सोप्या स्टेप्स जाणून घ्या
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्याआधी मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत याची माहिती आता घरबसल्या ऑनलाईन मिळत आहे, आपले नाव शोधण्यासाठी ह्या सोप्या ट्रीक वापरा....

मुंबई: महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या दरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) विशेष सखोल फेरनिरीक्षण ( SIR ) अंतर्गत मतदारांच्या नावे आणि पत्त्यांची माहितीला अपटेड केले आहे. आता मतदार घरबसल्या आपली मतदार यादी मोबाईलने डाऊन लोड करु शकतात. या अपडेटेड यादी https://mahasec.maharashtra.gov.in/ आणि https://mahasecvoterlist.in/ पोर्टलवर जिल्हेनिहाय आणि विधानसभा क्षेत्रानुसार उपलब्ध केली आहे. यामाध्यमातून तुम्ही देखील तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच आपला मतदार संघाची माहिती, उमेदवाराची संख्या आणि बूथची माहिती सहज आणि झटपट तपासू शकता.
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदारांना आपले नाव यादीत पाहाता येणार आहे. त्यासाठी आपले नाव मतदार यादीत बुथवर सकाळी जाऊन शोधण्यापेक्षा घरीच याची माहिती मिळवता येईल. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की ही अपडेटेड यादी आता राज्यातील मतदारांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. मतदार आता त्यांच्या मोबाईलवरही बसल्या जागी ही यादी डाऊन लोड करु शकतात. ही सुविधा निवडणूक प्रक्रियेला आणखी पारदर्शक आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
ही माहिती https://mahasec.maharashtra.gov.in/ आणि https://mahasecvoterlist.in/ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे, मतदार आता आपल्या मतदान यादीला जिल्हानिहाय आणि विधानसभेच्या क्षेत्रानुसार पाहू शकतात. यामुळे तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते मतदार सहजपणे त्यांच्या मतदार संघाची, उमदेवार संख्या आणि बूथची माहीती घेऊ शकतात.
व्होटर लिस्टला डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
1. सर्वात आधी आपल्या मोबाईल वा लॅपटॉपवरुन https://mahasec.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा
2. होमपेजवरील उपलब्ध Voter Search सेक्शनला उघडा
3. त्यानंतर Local Self Government Voterlist हे पेज उघडेल
4. Search Name In VoterList हा पर्याय ओपन करा
5. येथे तुम्ही EPIC Number Wise किंवा थेट नावाने देखील सर्च करु शकता
6. त्याखाली Download Voter list हा पर्याय देखील आहे
7. येथे तुम्ही मतदार यादी 1.Draft List, 2.Final List आणि 3. Booth List म्हणूनही सर्च करु शकता.
8. तुम्ही तुमच्या मोबाईलवर Matadhikar Mobile App देखील डाऊन लोड करु शकता.
SIR मोहिमें कोणते दस्तावेज गरजेचे
सध्या देशाच्या १२ राज्यात SIR मोहिम सुरु आहे. महाराष्ट्राचा नंबर अजून आलेला नससला तरी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही SIR मोहिमेंतर्गत तुमची माहीती अपडेट वा व्हेरीफाय करु इच्छीत आहात तर खाली दिलेल्या दस्तावेजांपैकी एक कागदपत्र जवळ बाळगा…
1. जन्मप्रमाण पत्र
2. पासपोर्ट वा शैक्षणिक प्रमाणपत्र
3. निवासाचा पुरावा
4. सरकारी कर्मचारी / पेन्शनदाताचे ओळख पत्र
5. जमीन वा गृह वाटप प्रमाणपत्र
6. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC)
7 . कुटुंब रजिस्टर वा स्थानिक पालिका प्रमाणपत्र
8. आधारकार्ड वा पॅनकार्ड
