AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘… महाराष्ट्राच्या मनातील आग बाहेर पडण्याचा हा क्षण’.., काय म्हणाले संजय राऊत ?

नाशिक ही क्रांतीकारकांची भूमी आहे. नाशिक ही वीर सावरकरांची भूमी आहे, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. परंतू कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही नगरी भ्रष्टाचाराने माजली असल्याचा आरोप शिवसेना नेते नाशिक येथील प्रचार सभेत केला.

'... महाराष्ट्राच्या मनातील आग बाहेर पडण्याचा हा क्षण'.., काय म्हणाले संजय राऊत ?
sanjay raut
| Updated on: Jan 09, 2026 | 10:41 PM
Share

उद्धव आणि राज साहेब एकत्र आल्याने काय झाले असे विरोधक विचारत आहे. परंतू हे दोघे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या मनातील आग बाहेर आली आहे. दोघे एकत्र आल्याने त्यांनी जनतेला त्यांच्या मनातील संतापला वाट मोकळी करण्याची संधी दिली आहे असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक येथील सभेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात धर्मध्वजा फडकवली, त्या धर्मध्वजावरही झाडाचे चित्र आहे. परंतू नाशिकमध्ये बिल्डरच्यासोयीसाठी झाडांची कत्तल केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की या शिट्ट्या आणि टाळ्या उद्धव आणि राज साहेबांसाठी आहे. ही ऐतिहासिक सभा आहे. या सभेत मशाली पेटल्या आहेत. इंजिन पुढे निघालं आहे. या इंजिनाला आणि मशालीला ऊर्जा देण्याचं काम या मैदानातील लाखो मराठी बांधव, शिवसैनिक आणि मनसैनिक. अभिमान बाळगावा अशी ही सभा आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली. यातच नाशिकचं महत्त्व कळलं असेल. दोघांनी एकत्र येणं ही राजकीय घडामोड नाही तर महाराष्ट्रातील मनातील आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे. ही आग आहे. ही आग आता बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे असेही राऊत यावेळी म्हणाले.

गुजरातच्या कंत्राटदारांना कामे मिळाली

‘हे नाशिक आहे. ही क्रांतीकारकांची भूमी आहे. नाशिकचे प्रश्न महाराष्ट्राचे आहेत. कुंभ नगरी, लवकर येथे कुंभ मेळा होईल. कुंभाच्या निमित्ताने नाशकात भ्रष्टाचार माजला आहे, तो हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही. कुंभाच्या निमित्ताने ५० हजार कोटींची कामे निघाली आहे. महाराष्ट्रातील बाहेरच्या खासकरून गुजरातच्या कंत्राटदारांना कामे मिळाली आहे. महाराष्ट्रातील लोकांनी काय करायचं. गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदाराला देतो. कुणाला कोणतं काम द्यायचं याची यादी दिल्लीतून आली आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

सावत्रभावापेक्षा वाईट अवस्था त्याने केली…

नाशिकला जी आश्वासने मिळाली होती आता ती सर्व फोल ठरली आहेत. पंतप्रधा्न नरेंद्र मोदी हे  स्मार्ट सिटी करणार होते. १०० शहरं काढली त्यात नाशिकचाही समावेश होता. . ३१ डिसेंबर २०२५पर्यंत स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होणार होते. पण आजही नाशिकची अवस्था पाटणा आणि बिहारसारखी झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले.  नाशिक येथे  पाच-  पाच दिवस नाशिकला पाणी मिळत नाही. नाशिकचे खासगीकरण करण्याचे काम सुरू आहे. फडणवीस यांनी नाशिक शहराला दत्तक घेतले होते. परंतू  सावत्रभावापेक्षा वाईट अवस्था त्याने केली. ड्रग्स शाळांच्या टपरी बाहेर मिळत आहेत. अंमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने मोठं आंदोलन केलं होतं. ज्यांच्या हातात नाशिकची सूत्रे दिली त्यांनी नाशिकचा सत्यानाश केला. त्यामुळे आता  चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि मनसेवर सोपवा असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...