AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचे कायदे आज मोदींना मदत करत आहेत, खासदार असदुद्दीन ओवैसी यांची टीका

या धुळ्याच्या महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढत आहे.अजित पवार शरद पवारांचे नाही झाले तर इतरांचे काय होणार ? असाही सवाल यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

काँग्रेसचे कायदे आज मोदींना मदत करत आहेत, खासदार असदुद्दीन ओवैसी यांची टीका
MP Asaduddin Owaisi
| Updated on: Jan 08, 2026 | 9:19 PM
Share

मोदींच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट वा सोशल मीडियावर काही टाकले तर लगेच कारवाई केली जाते. अशा पद्धतीच्या कायद्याला आम्ही संसदेत विरोध केला होता. काँग्रेसने अशा पद्धतीचे कायदे बनवले.त्यावेळी मोदी यांनी या कायद्यांना सपोर्ट केला.अशा कायद्याचे मुस्लिम ,दलित आणि ओबीसी शिकार झालेत.दोन मुले गेली साडे पाच वर्षे तुरुंगात आहेत.हा कायदा बनवणारे लोक काँग्रेसवाले होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा कोणी नेता दोन ते पाच वर्ष तुरुंगात राहिला काय ? डॉ. मनमोहन सिंगच्या सरकारने हा कायदा बनवला होता. 2019 मध्ये अमित शाह यांनी हा कायदा आणखी कडक केला. काँग्रेसने बनवलेले कायदे आज मोदींना मदत करत आहेत. अमित शाह यांनी जो कायदा आणला आम्ही त्याच्याविरोधात मतदान केलं असे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धुळ्यातील सभेत म्हटले आहे.

या अन्याय विरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल

मी जर काँग्रेसवाल्याविरोधात बोलायला सुरुवात केली तर हे माझा मुकाबला नाही करू शकणार. 1962 जम्मू-काश्मीरमध्ये दंगे झाल्यानंतर त्यावेळेसच्या पिडीतांना बांगलादेशमध्ये ढकलल गेलं. आज मुसलमान दिसला की त्याला बांगलादेशी म्हणतात.आज मोदी देखील काँग्रेसच्या पॉलिसीवर काम करत आहेत. मुंबईच्या रेल्वेत बॉम्बस्फोट झाला. या घटनेत 11 मुसलमानांना पकडले गेले. 19 वर्षे ते लोक तुरुंगात होते. कोणाचे सरकार होते त्यावेळेस? काँग्रेस सत्तेत होती. हायकोर्टाने सांगितले हे 11 लोक बेकसुर आहेत. काय गुन्हा होता त्यांचा. मुंबई पोलिस मधल्या मुसलमानांना एटीएसने टॉर्चर केले. या अन्याय विरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल असेही खासदार असदुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

धुळे, मालेगाव संभाजीनगर, विदर्भामध्ये एमआयएम

यासाठी तुम्हाला धुळ्यामध्ये धुळे महापालिकेत एमआयएमच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल.आम्ही मागे हटणारे नाही. पुढील पाच वर्षात पुन्हा एकदा धुळे, मालेगाव संभाजीनगर, विदर्भामध्ये एमआयएमचे आमदार निवडून येतील. कोणाला असं वाटत असेल की त्यांच्या जाण्याने एमआयएम कमजोर झाली असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. त्यांना वाटत असेल की मी आहे तर एमआयएम आहे. तर हे चुकीचे असल्याची टीका माजी आमदार डॉक्टर फारुक शाह यांचे नाव न घेता ओवैसी यांनी केली. लोकसभेच्या निवडणुकीत इम्तियाज जलील 1200 मतांनी हरले. तरी ते मनाने हरले नाहीत. ते आजही एमआयएममध्ये खंबीरपणे उभे आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रात 16 तारखेच्या निकालात पतंग उडताना दिसेल

बीजीपीवाले सांगतात मकर संक्रांतीला MIM च्या पतंगवर बंदी घाला.पण यावेळेस धुळ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात 16 तारखेच्या निकालात पतंग उडताना दिसेल. वक्फ बोर्डाच्या जमिनींवर पण कारवाई सुरू आहे. हिंदू देवस्थान कमिटीमध्ये बाहेरचा कोणीही प्रतिनिधी बनू शकत नाही. मात्र वक्फ बोर्डाच्या कमिटीत नॉन मुस्लिम पण सदस्य बनू शकतो असा कायदा बनवला आहे. या कायद्यानंतर महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणूक होत आहेत. तुम्ही या निवडणुकांमध्ये सरकारच्या विरोधात मतदान करा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना यावेळी दिला.

त्या ऑडिओ क्लीपने तापवलं ठाण्यातील राजकारण; माजी महापौर थेट म्हणाल्या.
त्या ऑडिओ क्लीपने तापवलं ठाण्यातील राजकारण; माजी महापौर थेट म्हणाल्या..
' मनसेत पुन्हा भूकंप? आणखी एक बडा नेता नाराज
' मनसेत पुन्हा भूकंप? आणखी एक बडा नेता नाराज.
Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?
Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?.
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?.
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका.
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली.
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?.
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर.
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....