तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना घेरलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे महापालिका निवडणूकांचा प्रचारासाठी झंझावाती दौरा केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार प्रहार केले.

धुळ्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे.आमचे जयकुमारभाऊ सांगत होते, धुळे हा उज्ज्वल इतिहास असलेला जिल्हा आहे. महाराष्ट्राचं प्रवेशद्वार धुळे आहे, एका बाजूला गुजरात आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश आहे. एकेकाळचे अतिशय प्लान्ट शहर आहे. या शहरात अनेक वर्षात विकासाची कामेेन झाल्याने शहराची अवस्था बिकट झाली होती. 2003 साली स्थापन झालेल्या या मनपाने पहिल्यांदा विकास पाहिला तो, भाजपच्या काळात पाहिला. 2 वर्षांनी ही महापालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. या महापालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी मी हजर झालो आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहरात झालेल्या भाषणात ठणकावून सांगितले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त आहे, हे मान्य केलं पाहिजे. उमेदवारी महिला जास्त आहेत. जिथे नजर जाते तिथपर्यंत मला नागरिकच नागरिक दिसत आहेत. गिरीश भाऊंचं भाषण होणार होतं, त्यांचा आवाज बसला आहे, त्यांनी खूप भाषणं केली, कामे केली, त्यामुळे मी त्यांना सांगितलं एक दिवस तुमच्या घशाला आराम द्या. केवळ धुळ्याचा आकडा काढू नका, इतर ठिकाणचे आकडे काढून आम्हाला विजयी करा. पत्रकारांच्या सोयीसाठी सांगतो गिरीशभाऊ फक्त राजकारणातले आकडे काढतात, दुसरे कुठले आकडे काढत नाहीत असाही टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला.
तुमको मिरची लगी तो मैं क्या करु ?
आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात, पूर्ण बहुमत धुळेकरांनी भाजपला दिलं आहे. जी आश्वासनं या मंचावरुन दिली होती ती पूर्ण करण्याचे काम मी केले आहे. आपल्यासमोर मी उपस्थित आहे. यावेळी तुम्ही कमालच केली आहे. सुरुवातीलाच चौकार मारला. धुळ्यात 4 नगरसेवक निवडून आणले. विरोधकांना मिरची लागली, तुमको मिरची लगी तो मैं क्या करु ? धुळेकरांनी आमचे नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचे डोके कुठे आहे ? अशा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आले पाहिजे
आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे 170 कोटी रुपये पाण्याच्या योजनेला आपण दिले, आधी 10 दिवसाला धुळ्याला पाणी येत होते. धुळ्यातील प्रत्येक दिवशी माझी माता नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आले पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. पाणीयोजना सुरु केली त्याचं 70 टक्के काम झालं आहे. तापीची जुनी पाईपलाईन बदलण्याची मागणी केली आहे. तुम्ही केलेली प्रत्येक मागणी मान्य करण्यासाठी आलो आहे असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
प्रत्येक गरिबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं
70 वर्षे या देशातील शहरांवर अन्याय झाला, शहरं वाढत गेली आहेत. गावातील लोकं शहरात वाढत गेले, झोपडपट्टी, अतिक्रमणं झाली. घनकचरा व्यवस्थापन झाले नाही, शहरे बकाल झाली, दुर्गंधी मच्छर त्रास वाढला. 70 वर्षे शहरांकडे कुणी लक्ष दिलं नाही. मोदीजींनी सांगितलं गावासह शहराचा विकास झाला पाहिजे. मोदीजींनी आपल्याला पक्की घरं दिले. मात्र शहरात राहणारे गरीब लोकं आहेत, त्यांना त्यांच्या जमीनीचा मालकी हक्क नाही, त्यांच्याकडे बीआर कार्ड नाही. आम्ही प्रत्येक गरिबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देणार आहोत असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
