AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींना विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येतं' अशा शब्दात भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे.

'मोदींना विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात', भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
| Updated on: Jan 28, 2021 | 9:54 PM
Share

मुंबई : ‘मी विधानसभेत तुमच्या मुळे आणि तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येतं’ अशा शब्दात भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. मुंबई महापालिकेत आजपासून हेरिटेज वॉक सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भातखळकर यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.(Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray)

“मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला,” अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा दाखला दिला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

हेरिटेज वॉक उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. तसेच आजपासून मुंबई महापालिकेच्या भिंतीही त्यांचा इतिहास सांगतील, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तसेच मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केल आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते. महापालिकेत हेरिटेज वॉक केल्यानंतर महापालिका सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

संबंधित बातम्या :

मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार

Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.