AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार

आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे (Ajit Pawar appreciate work of Aditya Thackeray).

इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं' : अजित पवार
| Updated on: Jan 28, 2021 | 11:01 PM
Share

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामांचं कौतुक केलं (Ajit Pawar appreciate work of Aditya Thackeray).

“मुंबई महापालिकेत याआधी येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्य ठाकरेंमुळे मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Chahal) यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि मुंबई महापालिका यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका मुख्यालयाचं दर्शन हेरिटेज वॉकची संकल्पना राबवली जात आहे. हेरिटेज वॉकल मराठी शब्द शोधला पाहिजे. कारण आपण मराठीचे पुरस्कर्ते आहोत”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

“मुंबई महापालिकेची टोलेजंग आणि ऐतिहासिक इमारत बघणं आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा अनुभव सर्वसामान्यांना घेता येणार आहे. मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणबाबत ज्या वास्तूत निर्णय घेण्यात आले त्या वास्तूच्या इतिहासाशी समरस होण्याची संधी या निमित्ताने सर्वसामान्यांना मिळणार आहे. मी आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खरंच एक चांगला विचार केला”, असं अजित पवार म्हणाले.

“पर्यटन मंत्री चांगलं काम करत आहेत. नुकतंच पुण्यात आपण जेल टूरिझमसुद्धा आपण सुरू केलं आहे. पुण्याच्या जेलला एक इतिहास आहे. ही सुरुवात आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.

“मुंबईच्या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या लढवय्यांचे मोठं योगदान आहे. मुंबईच्या माणसात हा सर्व संकट परतून लावण्याची ताकद आहे”, असंदेखील यावेळी अजित पवार म्हणाले (Ajit Pawar appreciate work of Aditya Thackeray).

“मुंबई महापालिका ही शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री सेनेचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा एकदम बदलता येणार नाही पण मुंबईच्या रस्त्यावरील टपऱ्या बकालपणे दिसतात. यात बदल झाला पाहिजे”, असं पवार यांनी सांगितलं.

“मुंबईची नाईट लाईफ एक वेगळा प्रकार आहे. आजच्या तरुणांना ही योजना आवडेल. पण यात योग्य सुरक्षा पुरवू. काही लोक याला विरोध करतील पण मुंबईला नाईट लाईफची गरज आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

हेही वाचा : शेलार म्हणाले, देवेंद्रजी हे कृष्ण, आता सुदर्शनचक्र काढा, दरेकर म्हणतात, एकटे लढणारे वस्ताद!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.