लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर भातखळकरांची खोचक टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राला मिळणाऱ्या कोरोना लसीचं प्रमाण कमी असल्याचं म्हटलंय. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर भातखळकरांची खोचक टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 3:50 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. पण लसींचा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राला मिळणाऱ्या कोरोना लसीचं प्रमाण कमी असल्याचं म्हटलंय. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या संवादशैलीवरुन भातखळकर यांनी खोचक ट्वीट केलंय. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray)

“लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. – पक्षाचे मुख्यमंत्री”, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. भातखळकरांच्या या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करा – पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसलीय, असंही नाना पटोले म्हणालेत. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. 17 कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसूत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

संबंधित बातम्या : 

सर्व कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा; आता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार

BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.