“मुख्यमंत्र्यांना 3 स्मरणपत्रं, तरीही शेतकऱ्यांना मदत नाही, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

| Updated on: Jul 10, 2021 | 8:31 AM

"मुख्यमंत्र्यांना तीन-तीन स्मरणपत्र देवूनंही गेल्या हंगामातील नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत का?", अशी विचारणा हिंगणघाटचे भाजप आमदार समिर कुणावर यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना 3 स्मरणपत्रं, तरीही शेतकऱ्यांना मदत नाही, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
Follow us on

नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीवरुन भाजप आमदार समिर कुणावर (BJP MLA Samir Kunawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत का?, असा सवाल करत शेतकऱ्यांना मदतीचा दिलेला शब्द पाळा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी समिर कुणावर यांनी केली आहे. (BJP MLA Samir Kunawar Slam Cm Uddhav thackeray Over Farmer issue)

गेल्या हंगामात प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना मदत नाही, शासनाने पाऊल उचलावं

वर्धा जिल्ह्यातील हिॅगणघाटचे समिर कुणावार हे भाजपचे आमदार आहेत. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना तीन-तीन स्मरणपत्र देवूनंही गेल्या हंगामातील नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. कापूस, सोयाबीनच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालाय. पण वर्ष लोटलं तरिही मुख्यमंत्री मदत देत नाही”, असं समिर कुणावर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना 3 स्मरणपत्र लिहिली

सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट काळ सुरु आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अशावेळी शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे. उद्धव ठाकरे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी, मी तीन तीन स्मरणपत्र लिहूनही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत का? असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

काय म्हणाले आमदार समिर कुणावर…?

गेल्या हंगामात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तरीही बळीरीजाने संकटात दिवस काढले. शासनाने मदतीचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही शासनाने मदतीचं आश्वासन पूर्ण केलं नाही. दरम्यानच्या काळात मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन स्मरण पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं नाही… मुख्यमंत्री विसरभोळे झालेत की काय? अशी टीका करत शासनाने शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी समिर कुणावर यांनी केली आहे.

(BJP MLA Samir Kunawar Slam Cm Uddhav thackeray Over Farmer issue)

हे ही वाचा :

नागपूर पोलिसांना कडक सॅल्यूट, चोरीला गेलेले 116 मोबाईल केले परत

CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर