CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

एका युवतीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने दरोडेखोरांना अवनी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची टिप दिली होती. चारही दरोडेखोर उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे.

CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
Nagpur Avani Jewelers Robbery CCTV


नागपूर : नागपुरातील अवनी ज्वेलर्समध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तीन आरोपींनी ज्वेलर्स मालकाला मारहाण करुन दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. चार लाखांची रोकड आणि दागिने अशी 22 लाखांची लूट झाल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात दोन आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. भर दिवसा झालेल्या दरोड्याच्या घटनेमुळे नागपुरात व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. (Nagpur Avani Jewelers Robbery caught on CCTV Camera)

एका युवतीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने दरोडेखोरांना अवनी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची टिप दिली होती. चारही दरोडेखोर उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. बंदुकीच्या धाकाने दुकानदाराला ओलीस धरत सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा टाकल्याचा प्रकार नागपुरात पाच जुलै रोजी भरदिवसा घडला होता.

नेमकं काय घडलं?

दरोडेखोरांपैकी एक जण ग्राहक बनून दुकानात आला. थोड्या वेळात दुसऱ्याने दुकानात प्रवेश करत दुकानदारावर बंदूक धरली. त्यानंतर तिसऱ्याने दुकानात प्रवेश करत शटर बंद केलं. दुकानदाराचे हात पाय बांधून त्याला मारहाण केली. तर इतरांनी दुकानात असलेली चार लाख रुपयांची कॅश आणि सोन्या चांदीचे दागिने लुटले.

यावेळी एक जण बाहेर पाळत ठेऊन होता. दुकानदार दुकानात एकटाच असल्याने तो काहीही करु शकला नाही. भर वस्तीतील अगदी रस्त्यावर असलेलं दुकान दरोडेखोर लुटत होते मात्र बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याची कल्पनाही आली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर बाबींचा आधार घेत आरोपींचा शोध सुरु केला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बॉयफ्रेंडच्या मदतीने टिप, नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडेखोरांना मध्य प्रदेशात अटक

नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपास

दहिसर साईराज ज्वेलर्स लूट आणि हत्या, मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक, सात जणांना बेड्या

(Nagpur Avani Jewelers Robbery caught on CCTV Camera)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI