दहिसर साईराज ज्वेलर्स लूट आणि हत्या, मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक, सात जणांना बेड्या

बंदुकीचा धाक दाखवून तिघे जण ३० जूनला दहिसरमधील ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले होते. ज्वेलर्स मालकाने विरोध केल्याने लुटारुंनी त्याच्यावर गोळी झाडली होती. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

दहिसर साईराज ज्वेलर्स लूट आणि हत्या, मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक, सात जणांना बेड्या
आरोपी बाईकस्वार (डावीकडे)


मुंबई : दहिसर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य सूत्रधार बंटी पाटीदार आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. दोघांनाही मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. ओम साईराज ज्वेलर्स (Om Sairaj Jewelers) या दागिन्यांच्या दुकानात 30 जून रोजी गोळीबार करण्यात आला होता. मालक शैलेंद्र पांडेय यांच्यावर गोळी झाडून तिघे जण दुकान लुटून पसार झाले होते. (Mumbai Dahisar Om Sairaj Jewelers Robbery Jewelry Shop owner Killed Main Accuse arrested)

यापूर्वी 1 जुलै रोजी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मुख्य सूत्रधारासह आणखी एकाच्या अटकेमुळे आतापर्यंत या प्रकरणात एकूण अटकेतील आरोपींना संख्या 7 झाली आहे. लूट करण्याच्या उद्देशाने 30 जून रोजी दागिन्यांच्या दुकानात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत आरोपींनी दुकान मालकाला गोळ्या घालून ठार केले आणि सोन्याची लूटमार करुन पळ काढला होता.

नेमकं काय घडलं?

दहिसर पूर्व येथील रावळपाडा परिसरात गावडे नगर भागात बुधवार 30 जून रोजी सकाळी ही धक्कादायक घटना घडली होती. बंदुकीचा धाक दाखवून तिघे जण ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले. ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केला असता लुटारुंनी त्याच्यावर गोळी झाडली. यामध्ये शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज

हत्येनंतर दुकानात लूट करुन तिन्ही आरोपी पसार झाले. तिन्ही आरोपी एकाच बाईकवरुन आले होते. दहिसर पोलिसांनी घटनास्थळी तपास  केला. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी जाऊन पाहणी करुन आले होते.  मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी करण्याचे आदेश देत आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज जारी केले होते.

संबंधित बातम्या :

दहिसरमध्ये सोन्याच्या दुकानात लूट, मालकाची गोळी झाडून हत्या, नांगरे पाटील घटनास्थळी

लॉकडाऊनचा फटका, पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

(Mumbai Dahisar Om Sairaj Jewelers Robbery Jewelry Shop owner Killed Main Accuse arrested)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI