AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहिसरमध्ये सोन्याच्या दुकानात लूट, मालकाची गोळी झाडून हत्या, नांगरे पाटील घटनास्थळी

बंदुकीचा धाक दाखवून तिघे जण दहिसरमधील ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले. ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केला असता लुटारुंनी त्याच्यावर गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे

दहिसरमध्ये सोन्याच्या दुकानात लूट, मालकाची गोळी झाडून हत्या, नांगरे पाटील घटनास्थळी
आरोपी बाईकस्वार (डावीकडे)
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 2:18 PM
Share

मुंबई : सोन्याच्या दुकानात शिरुन ज्वेलर मालकाची हत्या (Dahisar Jewelry Shop owner Killed) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दहिसर भागात घडली आहे. ओम साईराज ज्वेलर्सचे (Om Sairaj Jewelers) 45 वर्षीय मालक शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा लुटारुंच्या गोळीबारात मृत्यू झाला. हत्येनंतर तिघेही जण दुकान लुटून पसार झाले. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Dahisar Jewelry Shop owner Killed by robbers)

नेमकं काय घडलं?

दहिसर पूर्व येथील रावळपाडा परिसरात गावडे नगर भागात बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. बंदुकीचा धाक दाखवून तिघे जण ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले. ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केला असता लुटारुंनी त्याच्यावर गोळी झाडली. यामध्ये शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज

हत्येनंतर दुकानात लूट करुन तिन्ही आरोपी पसार झाले. दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार झाले.

तिन्ही आरोपी एकाच बाईकवरुन आले होते. दुकानातील सोनं लुटल्यानंतर ते पसार झाले. मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनचा फटका, पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

कल्याणमधील थरार! बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा, 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास

(Mumbai Dahisar Jewelry Shop owner Killed by robbers)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.