नागपूर पोलिसांना कडक सॅल्यूट, चोरीला गेलेले 116 मोबाईल केले परत

नागपूरसह परिसरात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे.

नागपूर : नागपूरसह परिसरात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला गेलेले हे मोबाईल शोधण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. सायबर पोलिसांनी चोरीला गेलेले 116 मोबाईल परत मिळवले आहेत. 36 लाख रुपये किंमतीचे हे 116 मोबाईल आज लोकांना परत करण्यात आले. नागपूर पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत हे 116 मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले. (Nagpur police returned 116 stolen mobiles)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI