AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला मोठं भगदाड, आजी माजी 12 नगरसेवक शिवसेनेत, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.

भाजपला मोठं भगदाड, आजी माजी 12 नगरसेवक शिवसेनेत, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 6:32 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics ) युतीचे तर्क लढवले जात असताना, भाजपला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेने पुन्हा भाजपला धक्का (Shiv Sena BJP) दिला आहे. कारण थोडेथोडके नाही तर तब्बल आठ ते नऊ नगरसवेकांनी शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेचे हे नगरसेवक आहेत. (seating 10 BJP corporators from Hinganghat Wardha joins Shiv Sena in the presence of CM Uddhav Thackeray at Varsha major setback to BJP)

त्यामुळे विदर्भात भाजपला सर्वात मोठं भगदाड पडल्याचं चित्र आहे. निवडणुकीपूर्वी हिंगणघाट नगरपरिषदेतील भाजपचे आठ ते नऊ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येऊन ते शिवबंधन बांधत आहेत. भाजपचे स्थानिक आमदार समीर कुणावर यांच्या कामाला कंटाळून शिवसेना प्रवेश करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेनेची पक्षबांधणी 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँम्बमुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजपा युती होणार का याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवलीय. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय. गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे. असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.’

चंद्रकांत घुसे, उपाध्यक्ष, नगर पालिका सतिश ढोबे सुरेश मुंजेवार भास्कर थावरी मनोज वाघमारे नीता ढोबे निलेश पोगळे सुनिता पचोरी संगिता वाघमारे मनीष देवढे बंटी वाघमारे

Hinganghat BJP corporators joins Shiv Sena

Hinganghat BJP corporators joins Shiv Sena

मुक्ताईनगरातील आजी माजी नगरसेवक शिवसेनेत

तिकडे शिवसेनेने गेल्याच महिन्यात भाजपला धक्का दिला होता.  मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवे केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं होतं. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला होता.

शिवसेना-भाजप युतीची चर्चा 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik letter) यांनी पुन्हा भाजपसोबत जुळवून घेण्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा (Shiv Sena BJP yuti) युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे, असं रोखठोक भाष्य भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या 

मुक्ताईनगरात भाजपला धक्के सुरुच, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावात भाजपला हादरे सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तीन नगरसेवक शिवसेनेत

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.