AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित

भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे. आमदार जीएस दामोर […]

मध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 28, 2019 | 9:27 PM
Share

भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे.

आमदार जीएस दामोर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. दामोर यांची संसदेवर निवड झाल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यास 230 सदस्यसंख्या असलेला आकडा 229 वर येईल. जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत ही परिस्थिती राहू शकते. सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. दुसरीकडे झाबुआ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक बाकी आहे. काँग्रेसकडे सध्या 115 आमदार आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना अस्थिरतेचा धोका टळला आहे.

काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जातोय. 229 वर संख्याबळ आल्यामुळे काँग्रेसची स्थिती आणखी मजबूत झाल्याचं भाजप नेतेही मान्य करतात. तर विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी अनेकदा सरकार पाडण्याचा इशारा दिलाय. पण तूर्तास आम्हाला कोणतीही घाई नसल्याचंही ते म्हणाले.

आमदार असताना संसदेत निवड झाल्यानंतर आमदारकी किंवा खासदारकी यापैकी एक निवडणं गरजेचं असतं. रतलामचे आमदार यापैकी काय निवडतील यावरही भाजप नेत्याने उत्तर दिलं. राज्यातच राहण्याची आता कोणतीही शक्यता नाही. कारण काँग्रेसवाले अगोदरच घाबरलेले आहेत. आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. त्यांच्यातच अंतर्गत वाद चालू आहेत आणि एक दिवस सरकार आपोआप पडणार आहे, असं एका भाजप नेत्याने सांगितलं.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...