AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना ‘भारतरत्न’साठी प्रयत्न, भाजपचं संकल्पपत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने आज आपलं संकल्पपत्र (BJP Manifesto Maharashtra) प्रकाशित केलं.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना 'भारतरत्न'साठी प्रयत्न, भाजपचं संकल्पपत्र
| Updated on: Oct 15, 2019 | 11:36 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने आज आपलं संकल्पपत्र (BJP Manifesto Maharashtra) प्रकाशित केलं. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपने (BJP Manifesto Maharashtra) आपला जाहीरनामा प्रकाशित केला.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा “भारतरत्न” पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटलं आहे.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र,  निसर्गावर अवलंबून असणारी शेती शाश्वत शेतीकडे नेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यावर भर असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्याच पाणी मराठवढ्याला देणं असेल, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, इथे पुढच्या 5 वर्षात पाणी पोहोचवू. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही आमची संकल्पना आहे. यावर आम्ही एक रोड मॅप तयार केला आहे. त्यातून रोजगारासह सर्व विषयावर भर देणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

गेल्या पाच वर्षात जे कार्य झाले त्याचा अनुभव, विविध समस्यांना सामोरे जात असताना त्याची उत्तरं आणि भविष्यातल्या गोष्टी या संकल्पपत्रात आहेत. दुष्काळ, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा यावर भर दिला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

भाजपच्या संकल्प पत्रात एकूण सोळा घोषणा

– दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करणार, कुठे कमी तर कुठे अधिक पाऊस होतोय, त्यामुळे पाणी वाटपाचं नियोजन. कोकणात खूप पाणी आहे पण पिण्याच्या पाण्याची अडचण सोडवणार.

– मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून पाणी प्रत्येक घरात पाईपलाईनच्या माध्यमातून पोहोचवणार

– शेतीला पूर्ण वीज वाटप करण्यासाठी सोलारमार्फत 12 तास पुरवठा

  1 कोटी लोकांना रोजगार देणार

 एक कोटी महिलांना बचतगटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करणार

 प्रत्येक बेघराला 2022 पर्यंत घर आणि प्रत्येकाला पिण्याचं पाणी देणार

 – पायाभूत सुविधांमध्ये केंद्राच्या मदतीने 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार

 राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्व वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडणार त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा 30 हजार किमी लांबीचा ग्रामीण रस्ते बनवणार आणि शेतकऱ्यांसाठी  शेतात जाणार रस्ता “पाणंद रस्ते,” म्हणून मजबूत करणार

 भारत नेट आणि महानेटच्या माध्यमातून महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार

 आरोग्य सर्वांसाठी, सर्वांच्या आवाक्यातील, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जनारोग्य योजना यांची व्याप्ती वाढून पैश्याअभावी कुणाचंही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करणार

 शिक्षण हे काल सुसंगत अधिक मूल्यधिष्टीत करणार, राष्ट्रीय आणि संवैधनीक मूल्याचे शिक्षण देणार

 सर्वप्रकारच्या कामगारांना नोंदीत करुन सामाजिक सुरक्षेच्या परिघात आणणार

 राज्यातील सर्व शहीद जवान, माजी सैनिक, कर्तव्यपालन करताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचे कुटुंबीय यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्यक्रम राबवणार

 राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनासाठी धडक मोहीम राबवून पुनर्वसनाचा काम लवकर पूर्ण करणार

 महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा “भारतरत्न” पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.