Video : Chitra Wagh : भाजपनं सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाला पदमुक्त केलंय, महिलेनं तक्रार दिल्यास कारवाई होणार, चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Jul 12, 2022 | 10:03 PM

सोलापूर : भाजपचा सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाघ यांच्या संदर्भातला व्हिडीओ समोर आलाय. यातील संबंधित महिलेनं तात्कळ पोलिसांत तक्रार द्यावी. तर योग्य कारवाई होईल, असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्या पदावरून मुक्त केलंय, अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी टाकलीय. त्यात त्यांनी चंद्रकांत पाटील […]

Video : Chitra Wagh : भाजपनं सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाला पदमुक्त केलंय, महिलेनं तक्रार दिल्यास कारवाई होणार, चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण
महिलेनं तक्रार दिल्यास कारवाई होणार, चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण
Follow us on

सोलापूर : भाजपचा सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाघ यांच्या संदर्भातला व्हिडीओ समोर आलाय. यातील संबंधित महिलेनं तात्कळ पोलिसांत तक्रार द्यावी. तर योग्य कारवाई होईल, असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्या पदावरून मुक्त केलंय, अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी टाकलीय. त्यात त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं पत्र जोडलं. त्या पत्रात भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (Solapur Rural District President) श्रीकांत देशमुख यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी स्वीकारला आहे. जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभर सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख (Vikram Deshmukh) यांच्या सोपवित आहे, असं पाटील यांच्या पत्रात आहे.

हे सुद्धा वाचा

या माणसानं मला फसविलंय

सोलापूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासोबतचा बेडरुमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्या व्हिडीओत संबंधित महिला या माणसानं मला फसविलं असं म्हणते. हा श्रीकांत देशमुख आहे. हा बायकोशी संबंध ठेऊन माझ्याशी संबंध ठेवतोय हा. तू माझ्याशी का खोट बोललास, असं ही महिला म्हणते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता श्रीकांत देशमुख यांचा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात आला. यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिलेनं अधिकृत तक्रार करावी. पोलीस त्यावर योग्य ती कारवाई करतील, असं चित्रा वाघ यांनी ट्वीट केलंय.

काय आहे प्रकरण

श्रीकांत देशमुख यांचा बेडरूम व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडीत महिलेनं केलाय. या मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तरुणीनं बेडरुममधील व्हिडीओ व्हायरल केला. तरुणीच्या आरोपामुळं सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली. गेल्याच आठवड्यात ही तरुणी मला हनी ट्रपमध्ये अडकवित असल्याची तक्रार देशमुख यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात केली होती.